उन्हाळा म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवतो तो म्हणजे या सिझनमध्ये येणारा गोड - रसाळ आंबा. आंब्याचा तो गोडवा आणि रसाळ चव आठवली की कुणालाही तो खाण्याचा मोह आवरत नाही. पण ज्यांना डायबिटीस आहे, त्यांच्यासाठी आंबा खाणं म्हणजे थोडी काळजीची गोष्ट ठरते. “आंबा खाल्ला तर शुगर वाढेल का?” हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. डायबिटीस असणाऱ्यांनी आंबा खाणं म्हणजे एक मोठी धाकधूक असते. रक्तातील साखर वाढेल या भीतीने अनेकजणांना आंबा आवडूनही तो मनसोक्तपणे खाता येत नाही. फळांचा राजा असण्यासोबतच आंब्यामध्ये अनेक चांगले गुणधर्म असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, व्हिटॅमिन ए सारखी अनेक पोषक तत्वे असतात, जी त्वचेपासून पचनापर्यंत सर्व गोष्टींसाठी फायदेशीर मानली जातात(does eating mango raise blood sugar).
आंबा खाणं आपल्या आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असलं तरी देखील डायबिटीस असणाऱ्यांना नेहमीच आंबा खाण्याबाबत शंका असते की, त्यांच्यासाठी आंबा खाणे सुरक्षित आहे का? आंबा खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का? असे एक ना अनेक प्रश्न सतावतात. यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबाद येथील (tips to eat mango without raising blood sugar) सीनियर कन्सलटंट जनरल फिजिशियन डॉ. विघ्नेश वाय यांनी आंबा खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का? किंवा डायबिटीस असेल तर आंबा खाण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती अशा अनेक प्रश्नांची माहिती सांगितली आहे. योग्य पद्धत, अचूक वेळ आणि प्रमाणाचे भान राखल्यास, शुगर वाढण्याची चिंता न करता तुम्हीही आंब्याचा मनसोक्त (does mango increase blood sugar in diabetics) आस्वाद घेऊ शकता. आंबा खाऊनही रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते पाहूयात.
आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि शुगर कंटेंट किती असतो?
डॉ. विघ्नेश सांगतात की, आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) ४१ ते ६० च्या दरम्यान असतो, ज्यामुळे तो 'मध्यम श्रेणीत' येतो. त्याचप्रमाणे, १०० ग्रॅम आंब्यामध्ये साधारणपणे १४ ग्रॅम नैसर्गिक साखर असते. पूर्ण पिकलेला आंबा रक्तातील साखर वेगाने वाढवू शकतो. याउलट, कैरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यासोबतच, १०० ग्रॅम आंब्यामध्ये सुमारे १.६ ग्रॅम फायबर असते, जे रक्तातील साखरेचे शोषण थोडे संथ करते. यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. अशा परिस्थितीत, या सिझनमध्ये डायबिटीस असणारे देखील आंबा खाऊ शकतात; परंतु हे लक्षात ठेवा की, आंबा मर्यादित प्रमाणातच खावा. अतिप्रमाणात आंबा खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
डायबिटीस असेल तर दिवसाला किती प्रमाणात आंबा खावा ?
डॉ. विघ्नेश म्हणतात की, जर तुम्हाला शुगर वाढण्याचा धोका असेल (प्री-डायबेटिक), तर तुम्ही दिवसाला एक छोटा आंबा म्हणजेच साधारण १५० ग्रॅम आंबा खाऊ शकता. मात्र, जर तुम्हाला आधीच डायबिटीसचा त्रास असेल, तर तुम्ही पूर्ण दिवसात अर्धाच आंबा खावा. जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.
शुगर वाढू नये म्हणून आंबा कसा खावा?
जर तुम्ही योग्य पद्धतीने आंबा खाल्ला, तर रक्तातील साखर अचानक वाढण्यापासून मोठ्या प्रमाणात रोखता येते.
१. आंबा नेहमी प्रथिने किंवा हेल्दी फॅट्स असणाऱ्या पदार्थांसोबतच खाण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, तुम्ही आंबा दही, विविध बिया (Seeds) किंवा बदामासोबत मिक्स करून खाऊ शकता.
२. खूप जास्त पिकलेला आंबा खाण्याऐवजी थोडा कमी पिकलेला किंवा मध्यम आंबा खावा, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो.
३. आंबा थेट खाण्याऐवजी तो सलाडमध्ये मिक्स करून किंवा स्मूदी बनवून (साखर न घालता) खाऊ शकता.
४. कधीही रिकाम्या पोटी आंबा खाऊ नका, कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.
५. मॅंगो ज्यूस किंवा आमरस पिण्यापेक्षा आंब्याच्या फोडी खाणे केव्हाही चांगले. ज्यूस बनवताना त्यातील फायबर (तंतूमय पदार्थ) कमी होतात, ज्यामुळे शुगर लेव्हल वाढण्याचा धोका जास्त असतो.
Web Summary : Diabetics can enjoy mangoes by controlling portion size and timing. Eating mangoes with protein or healthy fats, choosing less ripe fruits, and avoiding empty stomach consumption helps manage blood sugar levels. A doctor advises limiting intake to half a mango daily for diabetics.
Web Summary : डायबिटीज के मरीज भी आम का आनंद ले सकते हैं, बस मात्रा और समय का ध्यान रखें। प्रोटीन या हेल्दी फैट्स के साथ आम खाने, कम पके फल चुनने और खाली पेट खाने से बचने से ब्लड शुगर नियंत्रित रहता है। डॉक्टर प्रतिदिन आधा आम खाने की सलाह देते हैं।