Health Tips : निरोगी आणि फिट रहावं अशी सगळ्यांचीच इच्छा असते. कारण आजारपणात वेळ तर जातोच जातो, सोबतच पाण्यासारखा पैसाही लावावी लागतो. वाढत्या वयात तर वेगवेगळ्या आजारांचा धोका अधिकच वाढतो. कारण आजकालची लाइफस्टाईल फार बदलली आहे. हेल्थ एक्सपर्ट नेहमीच सांगत असतात की, वयाची चाळिशी ओलांडली की, तब्येतीची अधिक काळजी घ्यावी. यासाठी चाळिशीनंतर काही महत्त्वाच्या वैद्यकीय तपासण्या वेळोवेळी करणं अत्यंत गरजेचं आहे. या तपासण्यांमुळे शरीरात कोणती कमतरता आहे हे समजू शकतं आणि अनेक गंभीर आजारांपासून वेळेवर बचाव करता येतो. एम्स, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून प्रशिक्षित आणि कॅलिफोर्निया येथील गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितल्याप्रमाणे, खालील तीन तपासण्या वाढत्या वयात अत्यावश्यक आहेत.
आयुष्य वाचवणाऱ्या ३ महत्त्वाच्या तपासण्या
लिपिड प्रोफाइल टेस्ट
या तपासणीत एलडीएल, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण तपासले जाते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी करता येतो. जगात प्रत्येक १० तरुणांपैकी ४ जणांना हाय कोलेस्टेरॉलची समस्या असते, पण त्यांना त्याची जाणीव नसते. लिपिड प्रोफाइल केल्याने हृदयविकार आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका ओळखता येतो.
ब्लड शुगर टेस्ट
ही तपासणी केल्याने शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण समजते. वाढलेली ब्लड शुगर किडनीला हळूहळू नुकसान पोहोचवते आणि हृदय, मेंदू व इतर अवयवांवरही वाईट परिणाम करते. जगभरात सुमारे ५० कोटी लोकांना हाय शुगरची समस्या आहे, ज्यांपैकी अनेकांना हे माहितही नसतं की त्यांना डायबिटीज आहे.
बोन डेंसिटी टेस्ट
चाळिशीनंतर हाडांची घनता तपासणं आवश्यक आहे. वय वाढल्याने हाडं आणि स्नायू कमकुवत होतात. हाडांची घनता कमी झाल्यास ती सहज तुटू शकतात. प्रत्येक ३ स्त्रियांपैकी १ आणि ५ पुरुषांपैकी १ जणाला हाडदुखी किंवा ऑस्टिओपोरोसिससंबंधी समस्या भेडसावतात.
इतरी काही महत्वाच्या टेस्ट
कलोनोस्कोपी
कलोनोस्कोपी म्हणजे आतड्याच्या कर्करोगाची तपासणी. ज्यांना आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता आहे आणि ज्याना 40 किंवा त्याहून अधिक वय झाल्यावर कलोनोस्कोपी करण्यास सांगितली आहे, त्यांनी ही तपासणी करून घ्यावी. बहुधा, विष्ठेची तपासणी आणि ऑकल्ट ब्लडवर भर देऊन करण्यात यावी, फ्लेक्सिबल सिग्मॉइडोस्कोपी आणि / किंवा कलोनोस्कोपी आणि /किंवा सीटी कलोनोग्राफी दर पाच ते दहा वर्षांनी करावी. ज्यांना जोखीम जास्त आहे, त्यांना कलोनोस्कोपी अधिक वेळा करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
नेत्र तपासणी
वयाच्या चाळिशीमध्ये दृष्टी कमकुवत होणे सामान्य असते. या वयात बहुधा जवळचा चष्मा लागतो. नेत्रतज्ज्ञाची भेट घेणे हाच यावर उपाय आहे. तुमच्या दृष्टीमधील बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी 40 वर्षांवरील पुरुषांनी दर दोन वर्षांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. वाढत्या वयानुसार किंवा व्यक्तीला दृष्टी कमकुवत झाल्याचे जाणवत असेल तर नेत्रतपासणीची वारंवारता वाढत जाते. त्याचप्रमाणे ज्यांना ग्लाउकोमाचा धोका आहे आणि आपल्या चाळीशीत सुरू होऊ शकतो त्यांनी दर दोन वर्षांनी ग्लाउकोमाची चाचणी करावी. या व्यतिरिक्त मधुमेहींनी डायबेटिक रेटिनोपथीमुळे होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेव्यासाठी दर वर्षी नेत्र तपासणी करून घ्यावी.
म्हणून, नियमित आरोग्य तपासणी करून तुम्ही वाढत्या वयात होणाऱ्या आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दर ६ महिन्यांनी एकदा या तपासण्या करणं आवश्यक आहे, आणि शुगर तपासणी दर ३ महिन्यांनी नक्की करावी.
