Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Acidity ला सामान्य समजून करू नका दुर्लक्ष, Heart Attack चं असू शकतं लक्षण

Acidity ला सामान्य समजून करू नका दुर्लक्ष, Heart Attack चं असू शकतं लक्षण

Heart Attack Causes & Symptoms: कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रजनीश कपूर सांगतात की, हार्ट अ‍ॅटॅकच्या केसेस वाढण्यामागे लाइफस्टाईलचा मोठा हात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 10:36 IST2025-06-26T10:35:57+5:302025-06-26T10:36:32+5:30

Heart Attack Causes & Symptoms: कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रजनीश कपूर सांगतात की, हार्ट अ‍ॅटॅकच्या केसेस वाढण्यामागे लाइफस्टाईलचा मोठा हात आहे.

Doctor told causes of heart attack in young people and how to prevent heart attack | Acidity ला सामान्य समजून करू नका दुर्लक्ष, Heart Attack चं असू शकतं लक्षण

Acidity ला सामान्य समजून करू नका दुर्लक्ष, Heart Attack चं असू शकतं लक्षण

Heart Attack Causes : गेल्या काही वर्षात भारतात हार्ट अ‍ॅटॅकच्या केसेस खूप वाढल्या आहेत. २०२०-२०२३ दरम्यान भारतात हार्ट अ‍ॅटॅकच्या जवळपास ५० टक्के केसेस ४० पेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आढळून आल्या आहेत. आजकाल २५ ते ३० वयाच्या लोकांना सुद्धा हार्ट अ‍ॅटॅक येऊ लागला आहे. कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रजनीश कपूर सांगतात की, हार्ट अ‍ॅटॅकच्या केसेस वाढण्यामागे लाइफस्टाईलचा मोठा हात आहे.

अ‍ॅसिडिटीकडे दुर्लक्ष नको

डॉक्टरांनी NBT ला सांगितलं की, बऱ्याच रूग्ण पोटदुखी किंवा गॅसची समस्या घेऊन येतात. पण जेव्हा त्यांचं चेकअप केलं जातं तेव्हा त्यांच्यात हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणं दिसतात. कुणालाही जर अ‍ॅसिडिटी होत असेल तर त्याला केवळ अ‍ॅसिडिटी समजून त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

डॉक्टर म्हणाले की, जर हार्ट अ‍ॅटॅकच्या सुरूवातीच्या तासांमध्ये उपचार मिळाले नाही, तर हृदयाच्या स्नायूंचं नुकसान होऊ शकतं. बऱ्याच लोकांना लक्षणं कळत नाहीत आणि उपचार घेणं टाळतात.

टेक्नॉलॉजीमुळे वाढला तणाव

बरेच लोक आजकाल स्मार्टवॉट वापरतात. त्यात ते दिवसातून अनेकदा हार्ट रेट चेक करत असतात. तरूण दिवसातून २० वेळा हार्ट रेट चेक करतात. यामुळे त्यांची चिंता वाढते आणि मानसिक तणाव हार्टचं आरोग्य बिघडवतो.

लाइफस्टाईल मोठं कारण

आजकाल तरूण मंडळी फार स्ट्रेसमध्ये जगत आहेत. अनहेल्दी फूड, सिगारेट, जंक फूड, फिजिकल अ‍ॅक्टिविटी कमी, एका जागी बसून जास्त वेळ काम, स्पर्धेचं टेंशन आणि झोप कमी घेतल्यानं हृदयावर वाईट प्रभाव पडतो.

जिम आणि सप्लीमेंटचा चुकीचा वापर

डॉक्टर म्हणाले की, तरूण लवकर रिझल्ट मिळवण्यासाठी जिममध्ये सप्लीमेंट्स घेत आहेत, ज्यांचा किडनी आणि हृदयावर प्रभाव पडतो. अशात तरूणांनी नॅचरल प्रोटीन घेण्यावर भर दिला पाहिजे.

Web Title: Doctor told causes of heart attack in young people and how to prevent heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.