What can smelly urine indicate: शरीराच्या रोजच्या काही नॅचरल क्रिया असतात, ज्यातील एक महत्वाची क्रिया म्हणजे लघवी करणे. लघवीच्या माध्यमातून शरीरातील विषारी तत्व बाहेर काढले जातात. ज्यामुळे शरीर आतून साफ राहतं. जेव्हाही आपण काही खातो किंवा पाणी पितो तेव्हा शरीरात या गोष्टीतील पोषक तत्व घेतं आणि शिल्लक राहिलेले अनावश्यक तत्व लघवीद्वारे बाहेर काढतं. अशात लघवीमधून हलका वास येणं सामान्य आहे. पण जर लघवीमधून नेहमीपेक्षा वेगळा वास येत असेल, तर शरीरात नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं यातून समजतं.
नॅचरोपॅथी डॉक्टर आणि रिसर्चर डॉ. जेनिन बॉवरिंग यांच्या यूट्यूब व्हिडिओचा हवाला देत एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, लघवीच्या वेगळ्या वासाला सामान्य समजून दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. डॉक्टरांनी हेही सांगितलं की, कोणत्या प्रकारचा वास कोणत्या समस्येकडे इशारा करतो. तेच समजून घेऊयात.
अमोनियासारखा वास
डॉ. जेनिन सांगतात की, जर लघवीमधून अमोनिया अॅसिडसारखा वास येत असेल तर शरीरात पाणी कमी झाल्याचा संकेत असू शकतो. शरीरात पुरेसं पाणी नसेल तर लघवी घट्ट होते आणि वास येतो. तसेच जर लघवी करताना जळजळ होत असेल किंवा खाज येत असेल तर हा यूटीआय इन्फेक्शनचा संकेत असू शकतो.
गोड वास
जर लघवीमधून हलका गोड वास येत असेल तर ही चिंतेची बाब ठरू शकते. असं होत असेल तर हा लघवीमध्ये शुगरचं प्रमाण जास्त झालं असं समजू शकता. हे डायबिटीस किंवा प्री-डायबिटीसमुळे होतं.
माश्यासारखा वास
जर लघवीमधून मास्यासारखा वास येत असेल तर हे महिलांमध्ये व्हजायनल इन्फेक्शनसारखं बॅक्टेरिअल व्हेजिनोसिसचं कारण असू शकतं. जे लोक फार जास्त मासे खातात त्यांच्यासोबतही असं होऊ शकतं. जर वास जास्तच येत असेल तर वेळीच टेस्ट करावी.
तीव्र वास
डॉक्टरांनुसार काही लोकांच्या लघवीमधून खूप तीव्र आणि टोचणारा वास येतो. असं अनेकदा व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स किंवा इतर सप्लीमेंट्समुळे होऊ शकतं. सप्लीमेंट घेणं बंद केलं तर ही समस्या दूर होते.
सल्फर किंवा कॉफीचा गंध
अनेकदा लघवीमधून सल्फर म्हणजे अंडी सडल्यासारखा वास येतो किंवा कॉफीसारखा वास येतो. ही काही फार चिेंतेची बाब नाही. कारण असं अनेकदा खाण्या-पिण्याच्या गोष्टी जसे की कॉफी किंवा लसूण-कांदे जास्त खाल्ल्याने होतं.
कधी करावी टेस्ट?
लघवीचा वेगळा वास काही दिवसांनी आपोआप दूर झाला नाही, ताप, पोटदुखी, जळजळ किंवा पुन्हा पुन्हा लघवी लागत असेल तर यूटीआय, डायबिटीस किंवा इन्फेक्शनची टेस्ट करावी.