Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सगळ्यात घातक १० पदार्थ, जिभेचे चोचले पुरवत राहिलात तर जन्मभरासाठी आजारपण छळेल

सगळ्यात घातक १० पदार्थ, जिभेचे चोचले पुरवत राहिलात तर जन्मभरासाठी आजारपण छळेल

Most Unhealthy Foods : जर डाएटमध्ये अनहेल्दी पदार्थांचा समावेश कराल तर डोळे, किडनी, लिव्हर, हृदय आणि मेंदुवर वाईट प्रभाव पडतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 20:03 IST2025-07-04T12:26:50+5:302025-07-04T20:03:34+5:30

Most Unhealthy Foods : जर डाएटमध्ये अनहेल्दी पदार्थांचा समावेश कराल तर डोळे, किडनी, लिव्हर, हृदय आणि मेंदुवर वाईट प्रभाव पडतो.

Doctor tells about 10 most unhealthy foods in the world you should avoid | सगळ्यात घातक १० पदार्थ, जिभेचे चोचले पुरवत राहिलात तर जन्मभरासाठी आजारपण छळेल

सगळ्यात घातक १० पदार्थ, जिभेचे चोचले पुरवत राहिलात तर जन्मभरासाठी आजारपण छळेल

Most Unhealthy Foods : आपण काय खातो किंवा पितो या गोष्टींचा आपल्या आरोग्याशी आणि शरीराशी मोठा खोलवर संबंध असतो. शरीराला आवश्यक ते पोषण मिळेल, अशा गोष्टी खाल्ल्या तर शरीराला ताकद मिळेल आणि आजारांपासून बचाव करता येईल. पण जर डाएटमध्ये अनहेल्दी पदार्थांचा समावेश कराल तर डोळे, किडनी, लिव्हर, हृदय आणि मेंदुवर वाईट प्रभाव पडतो. त्यामुळेच हेल्थ एक्सपर्ट नेहमीच पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला देत असतात.  

हेल्दी फूड कोणते असतात? असा प्रश्न पडला असेल तर ज्या पदार्थांमध्ये प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्ब्स, हेल्दी फॅट, व्हिटामिन, मिनरल्स आणि फायबर असतं, त्यांना हेल्दी फूड्स म्हटलं जातं. या गोष्टींमुळे शरीर आणि अवयवांची काम करण्याची क्षमता वाढते. पण आपल्याला सगळ्यात घातक पदार्थांबाबत माहीत आहे का?हेमाटोलॉजिस्ट डॉक्टर रवि के गुप्ता यांनी १० सगळ्यात अनहेल्दी फूड्सबाबत माहिती दिली आहे. 

लठ्ठपणा वाढतो

वरील सगळ्या फूड्समध्ये शुगर, फॅट, कार्ब्स आणि कॅलरी भरपूर प्रमाणात असतात. याच गोष्टी लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरतात. अशी चरबी शरीरासाठी नुकसानकारक असते आणि अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढवते.

डायबिटीसचा धोका

या फूड्समध्ये आर्टिफिशिअल शुगर असते. ज्यामुळे ब्लड शुगर स्पाइक होते आणि त्यामुळेच पुढे जाऊन डायबिटीस होतो. ज्यांच्या परिवारात आधीच कुणाला डायबिटीस असेल तर त्यांनी हे फूड्स खाणं बंद केलं पाहिजे.

हृदयरोगांचा धोका

या फूड्समध्ये फॅट आणि सोडिअमचं प्रमाण अधिक असतं. यानं हाय ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्टेरॉलची समस्या वाढते. कोलेस्टेरॉलनं नसा ब्लॉक होतात. अशात हृदयरोग, हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

Web Title: Doctor tells about 10 most unhealthy foods in the world you should avoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.