Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > करायला गेली एक आणि..! १३ वर्षांच्या मुलीच्या एक्स-रेत निघालं भलतंच काहीतरी-आईबाबा हतबल

करायला गेली एक आणि..! १३ वर्षांच्या मुलीच्या एक्स-रेत निघालं भलतंच काहीतरी-आईबाबा हतबल

Doctor found something unusual while scanning little girl's X-ray, something strange : एक्स-रेत असे काही दिसले जे पाहून तज्ज्ञांनाही बसला धक्का. पाहा नक्की काय प्रकार घडला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2025 13:54 IST2025-08-18T13:52:33+5:302025-08-18T13:54:19+5:30

Doctor found something unusual while scanning little girl's X-ray, something strange : एक्स-रेत असे काही दिसले जे पाहून तज्ज्ञांनाही बसला धक्का. पाहा नक्की काय प्रकार घडला.

Doctor found something unusual while scanning little girl's X-ray, something strange | करायला गेली एक आणि..! १३ वर्षांच्या मुलीच्या एक्स-रेत निघालं भलतंच काहीतरी-आईबाबा हतबल

करायला गेली एक आणि..! १३ वर्षांच्या मुलीच्या एक्स-रेत निघालं भलतंच काहीतरी-आईबाबा हतबल

अनेकदा मुलांना काही ट्रेंड फॉलो करायचे असतात किंवा नवीन फॅशन करायची असते. मात्र पालक प्रत्येक वेळी परवानगी देतातच असे नाही. पालकांनी नकार दिला की मुलं थोडीच शांत बसतात? (Doctor found something unusual while scanning little girl's X-ray, something strange )मग मुलं स्वतःचे मार्ग शोधतात आणि काहीतरी गडबड करतातच. असेच काहीसे अमेरिकेतीली वॉशिंग्टन शहरात घडले. दाताचे चेकअप करायला गेलेल्या मुलीला मोठे ऑपरेशन करुन घ्यावे लागले. असेही घडू शकते पाहून सोशल मिडियावर लोकांना धक्काच बसला. 

झाले असे की एक आई आपल्या १३ वर्षाच्या मुलीला घेऊन डेंटल चेकअपला गेली. मुलीला वाकड्या दातांसाठी ब्रेसेस लावायच्या होत्या. त्यासाठी आधी एक्स-रे चेकअप्स अशा काही चाचण्या केल्या जातात आणि मग तज्ज्ञ पुढील निर्णय घेतात. त्याच प्रमाणे दातांचा आणि चेहऱ्यावरील इतर रचनांचा एक्स-रे काढवा लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र एक्स-रे पाहिल्यावर डॉक्टरांनाच धक्का बसला. मुलीच्या नाकात असे काही दिसले ज्याचा शोध घ्यायला तज्ज्ञांनाही बराच वेळ लागला.  

मुलीला नाक टोचून घ्यायचे होते. तिने आईला तिची इच्छा सांगितली. सगळ्याच मुली आजकाल नाक टोचून घेतात मलाही टोचायचे आहे अशी मागणी मुलीने केल्यावर आईने लगेच नकार दिला. १३ व्या वर्षी असे काही करु नकोस मोठी झालीस की कर असे आईचे उत्तर ऐकल्यावर मुलीला प्रचंड राग आला. आई असा नकार कसा देऊ शकते. मला काहीही झाले तरी नाक टोचायचेच आहे असे म्हणत त्या मुलीने स्वतःच मार्ग काढायचे ठरवले.

घरी स्वत:हूनच नाक टोचायचे असे तिने ठरवले. कानातल्याचा मागचा टोकदार भाग घेऊन तिने नाकाला भोक पाडायचा प्रयत्न केला. तिच्या नाकाला दुखापतही झाली मात्र तरी तिने प्रयत्न चालूच ठेवले. कानातल्याचे टोक नाकाजवळ असतानाच तिला शिंका आली आणि त्यामुळे कानातं नाकपुडीत शिरलं. मग तिने प्रयत्न थांबवले आणि सगळा प्रकार विसरुन गेली. काही महिन्यांनंतर जेव्हा दातांसाठी एक्स-रे काढला तेव्हा त्यात नाकपुडीत धातुचा तुकडा असल्याचे दिसले. तेव्हा लक्षात आले की कानातल्याचा तुकडा श्वास घेताना नाकपुडीत जाऊन अडकला. डॉक्टरांनी लगेचच ऑपरेशन करुन तो तुकडा काढून टाकला. नशीबाने श्वसनमार्गात काही अडथळा आला नाही. तो तुकडा आणखी वर गेला असता तर फार महागात पडले असते. मुलांनी असे काही प्रकार करण्याआधी विचार करावा. अविचारी वागणे आयुष्यावर बेतू शकते.  

Web Title: Doctor found something unusual while scanning little girl's X-ray, something strange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.