Most Unclean Body Part : जर कुणाला विचारलं की, शरीरातील सगळ्यात अस्वच्छ अवयव कोणता? तर नक्कीच यावर वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी उत्तरं मिळू शकतात. कारण सामान्यपणे सगळेच रोज आंघोळ करताना सगळेच अवयव चांगल्या पद्धतीनं स्वच्छ करतात. पण तरी सुद्धा अनेकांना शरीरातील एक असा अवयव माहीत नाही, जो सगळ्यात अस्वच्छ असतो. सामान्यपणे लोक डोळे, चेहरा, काख, केस यांच्या स्वच्छतेवर अधिक भर देतात. पण अशा एका अवयवाची स्वच्छता विसरतात जो शरीरातील सगळ्यात अस्वच्छ असतो.
साबण, शाम्पू लावून अंग घासल्यानंतरही असा भाग राहतो ज्याची पूर्णपणे स्वच्छता होत नाही. या भागामध्ये अब्जो बॅक्टेरिया राहतात आणि आपल्याला माहितही नसतं. हा दावा आमचा नाही तर रिसर्चमधून समोर आला आहे.
नाभि सगळ्यात अस्वच्छ अवयव
2012 मध्ये पीएलओएस वनमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, आपल्या नाभिमध्ये 2, 368 प्रकारचे बॅक्टेरिया असतात. यातील अनेक म्हणजे 1,458 प्रजाती वैज्ञानिकांसाठी नव्या आहेत. इथे सगळ्यात जास्त घाम येतो. नाभि स्वच्छ करणंही सोपं नसतं. कारण आत खड्डा असतो. त्यामुळे यातून दुर्गंधी येते आणि इथे बॅक्टेरिया वाढतात.
नाभि काय आहे?
विज्ञान सांगतं की, नाभि मुळात शरीरावरील एक घाव आहे. हा घाव तेव्हा तयार होतो, जेव्हा बाळ आपल्या आईपासून डिलीव्हरीदरम्यान वेगळं होतं. नाभि सामान्यपणे आतल्या बाजूने खोल असते.
काय करावा उपाय?
टोरांटोमध्ये डीएलके कॉस्मेटिक डर्मेटोलॉजी आणि लेजर क्लीनिकच्या त्वचा एक्सपर्टनुसार, नाभि बॅक्टेरियासाठी एक आदर्श प्रजनन स्थळ आहे. जर तुमचं वजन जास्त असेल, टाइप 2 डायबिटीस किंवा नाभिमध्ये छिद्र असेल तर नाभि स्वच्छ करण्यासाठी वॉशक्लॉथचा वापर केला जाऊ शकतो.
डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, जर कधी नाभिमध्ये खाज आली, नाभि लाल झाली, वेदना होत असेल किंवा दुर्गंधी येत असेल तर वेळीच सावध व्हा. असं काही इन्फेक्शन झालं तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
एक्सपर्टनुसार, नाभिची स्वच्छता करण्यासाठी स्वच्छ कापडाचा वापर करा. कपडा गरम पाण्यात बुडवून आणि सोप वॉटरचा वापर करून नाभि स्वच्छ केली जाऊ शकते.