Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > घसा खवखवतो? सारखी ढास लागते ? पाहा काय कारणे आहेत, वेळीच उपाय करायला हवे

घसा खवखवतो? सारखी ढास लागते ? पाहा काय कारणे आहेत, वेळीच उपाय करायला हवे

Do you have a sore throat? See what the reasons are : घशा खवखवत असेल तर हे उपाय करा. आधी पाहा कारणे काय असतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2025 18:11 IST2025-06-04T18:08:55+5:302025-06-04T18:11:43+5:30

Do you have a sore throat? See what the reasons are : घशा खवखवत असेल तर हे उपाय करा. आधी पाहा कारणे काय असतात.

Do you have a sore throat? See what the reasons are, and take timely measures. | घसा खवखवतो? सारखी ढास लागते ? पाहा काय कारणे आहेत, वेळीच उपाय करायला हवे

घसा खवखवतो? सारखी ढास लागते ? पाहा काय कारणे आहेत, वेळीच उपाय करायला हवे

पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप आणि इतर साथीचे रोग होतात. अनेक कारणे असतात. पावसाळा आला की डॉक्टरांकडे एक तरी खेप होतेच. औषधे घ्यावी लागतात. इंजेक्शन घ्यावे लागते.

काही त्रास असे असतात जे आपल्याला नीट सांगता येत नाही. नक्की काय होत आहे हे कळत नाही. (Do you have a sore throat?  See what the reasons are, and take timely measures.)त्याचे कारणही कळत नाही मग आपण दुर्लक्ष करतो. असे दुर्लक्ष घशाच्या खवखवीकडे केले जाते. कोणता तरी पदार्थ अडकला असेल असे म्हणून आपण सोडून देतो. मग हळूहळू खवखव वाढते आणि त्यातून घशाची इतर दुखणी सुरू होतात. घसा अनेक कारणांमुळे खवखवतो.    

संसर्गजन्य रोगामुळे घसा खवखवतो. रोगराईचे हे एक ठळक लक्षण आहे. वायरल इन्फेक्शन होण्याआधी खवखव जाणवते. सर्दी, खोकला, ताप असे काही होणार असेल तर घसा त्याचे संकेत देतो. त्यामुळे घसा खवखवल्यावर अजिबात दुर्लक्ष करायचे नाही. बॅक्टेरियाच्या शिरकावामुळे घसा खरवडला जातो. त्यामुळे त्रास होतो. घसा खवखवतो आणि असे वाटते की घशाला आतून खाज येत आहे. काही वेळा फंगल इंन्फेक्शनमुळे घसा खवखवतो. 
{e
१. धूळ, माती, प्राण्याचे केस आदी गोष्टींची अनेकांना अॅलर्जी असते. असे लोक ज्याची अॅलर्जी आहे त्या गोष्टींच्या संपर्कात आले की त्यांचा घसा खवखवतो. सर्दीमुळे नाक बंद होते. मग आपण तोंडाने श्वास घेतो. त्यामुळेही घसा खवखवतो. 

२. काही जण फार मोठ्या आजावात बोलतात. जोरात बोलल्यामुळे घशावर ताण येतो आणि खवखव सुरू होते. 

३. काही जणांना पित्ताचा त्रास असतो. पित्तामुळे घसा खवखवत नाही मात्र पित्त अन्ननलिकेत उलट्या दिशेने वर येते. उलटी होत नाही पण अन्न घशाशी येत राहते. त्या रसामुळे घसा सोलवटतो आणि खवखवतो. 

घसा खवखवल्यावर लगेच काही घरगुती उपाय करा. जसे की कोमट पाण्याच्या गुळण्या करा. अँण्टी बायोटिक गुणधर्म असलेले पदार्थ खायचे. जे घशाला आराम देतात. मध, आले असे पदार्थ गरम पाण्यातून खायचे. तुळशीचा कडक चहा प्यायचा. खवखव कमी होते. हळदीचे पाणी पिणे अगदीच फायद्याचे ठरते. वाफ घ्यायची. त्यानेही फायदा होतो. 

घरगुती उपायांना जर आराम मिळत नसेल. तर लगेच वैद्यकीय सल्ला घ्यायचा. खवखवल्यामुळे जर अन्न गिळताना त्रास होत असेल किंवा उलटी होत असेल तर लगेच डॉक्टर गाठा.     

Web Title: Do you have a sore throat? See what the reasons are, and take timely measures.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.