आजकाल जवळपास सगळ्यांकडेच दुचाकी असते. कुठेही जाताना हातात गाडी असणे सोयीचे ठरते. अनेक प्रकारच्या गाड्या असतात. (Do you feel a strong lump in your leg while riding a bike? See the reasons, a serious sign of a deficiency of 'this' thing)एक दुचाकी असली की दोन लोकांना बसता येते. चालवणारा एक आणि मागे बसणारा एक. बाइक असले स्कुटर किंवा स्कुटी असेल सगळ्यावर बॅकसिटची सोय असते. स्कुटीवर किंवा स्कुटरवर चालवणारा आरामात बसतो मात्र मागे बसणाऱ्याला जरा पाय फिरवून टाकावा लागतो अनेकदा असे बसायला जाताना पायात भयानक क्रॅम्प येतो. असे झाल्यावर लगेच आपण खाली उतरतो. कारण ते दुखणे फार असह्य व्हायला लागते. थोडावेळ पाय फार दुखतो मग कळ थांबली की आपण पुन्हा गाडीवर बसतो. हा प्रकार सगळ्यांसोबत होतोच. त्यात काही मोठी गोष्ट नाही. मात्र जर सतत असे क्रॅम्प येत असतील तर शरीरात काही तरी कमतरता आहे असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा पाय लांबवून किंवा वाकवून ठेवले जातात त्यावेळी असा त्रास जाणवतो.
क्रॅम्प आल्यावर पाय झटकायचा. पाय स्थिर ठेवल्यामुळे त्रास वाढू शकतो. हाताच्या बोटांनी दुखऱ्या भागावर चोळायचे असे केल्याने गोळा कमी होण्यास मदत होते. तसेच गाडीच्या मागे बसताना फार घट्ट कपडे घातल्यामुळेही असा त्रास होतो. त्यामुळे अगदी घट्ट असे काही घालू नका. पण हा क्रॅम्प का येतो हे जाणता का?
पायातील स्नायू पाय उचलताना ताणले जातात. बसताना त्यांच्यावर जोर पडतो दोन्ही क्रिया एकत्र झाल्यामुळे मग पायात गोळा येतो. त्यामुळे सगळा पाय ठणकायला लागतो. जर असा त्रास वारंवार होत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे लक्षण आहे. फक्त पाणीच नाही तर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारख्या खनिजांची कमतरता क्रॅम्पसाठी कारणीभूत ठरते.
तसेच वजन जास्त असल्यामुळेही पायात क्रॅम्प्स येतात. पाय फिरवून बसताना स्नायूंवर जोर पडतो आणि त्यामुळे पायात कळ मारते. गाडीवर जास्त बेळ फिरल्यामुळे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पायाची स्थिती बदला. गाडीवर पाय स्थिर ठेवावा लागतो. त्यामुळे लांबचा प्रवास असेल तर मध्येच ब्रेक घ्यायचा पायांना आराम द्यायचा.