Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज २ लिव्हर कॅन्सर, या कॅन्सरचा तरुणींना असतो जास्त धोका, कारण..

अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज २ लिव्हर कॅन्सर, या कॅन्सरचा तरुणींना असतो जास्त धोका, कारण..

Liver Cancer : दीपिकाच्या फॅन फॉलोईंगमध्ये अनेक तरूणी महिलांचाही समावेश आहे. इतक्या कमी वयात तिला लिव्हरचा कॅन्सर कसा झाला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 17:10 IST2025-05-28T16:49:13+5:302025-05-28T17:10:05+5:30

Liver Cancer : दीपिकाच्या फॅन फॉलोईंगमध्ये अनेक तरूणी महिलांचाही समावेश आहे. इतक्या कमी वयात तिला लिव्हरचा कॅन्सर कसा झाला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

Dipika Kakkar diagnose with stage 2 Liver Cancer, know why young women have more risk of liver cancer | अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज २ लिव्हर कॅन्सर, या कॅन्सरचा तरुणींना असतो जास्त धोका, कारण..

अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज २ लिव्हर कॅन्सर, या कॅन्सरचा तरुणींना असतो जास्त धोका, कारण..

Liver Cancer : टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करच्या (Dipika Kakkar Cancer) आजारपणाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. काही दिवसांआधीच दीपिकाचा पती अभिनेता शोएब इब्राहिम यानं सांगितलं होतं की, दीपिकाच्या लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आहे. कॅन्सर आहे की नाही हे तेव्हा माहीत नव्हतं. पण आता दोघांनीही इन्स्टावर माहिती दिली आहे की, दीपिकाला स्टेज 2 लिव्हर कॅन्सर (Liver Cancer) आहे. त्यामुळे त्यांचे फॅन्स चिंतेत आहेत. 

दीपिकानं इन्स्टावर एक नोट शेअर करत याची माहिती दिली. ज्यात तिनं तिच्या कॅन्सरबाबत माहिती दिली. दीपिकानं सांगितलं की, कशाप्रकारे पोटदुखीनं तिचं जीवन बदलून टाकलं. दीपिकानं आशा व्यक्त केली आहे की, या स्थितीचा सामना ती सकारात्मकतेने करेल. तसेच फॅन्सना तिनं प्रार्थना करण्यास सांगितलं.

दीपिकाच्या फॅन फॉलोईंगमध्ये अनेक तरूणी महिलांचाही समावेश आहे. इतक्या कमी वयात तिला लिव्हरचा कॅन्सर कसा झाला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. दोघांनी आजाराची माहिती तर दिली, पण कशामुळे झाला हे काही सांगितलं नाही. अशात लिव्हर कॅन्सरची कारणं काय असतात आणि तरूणीना याचा धोका अधिक का असतो, हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

तरूणींमध्ये लिव्हर कॅन्सरची लक्षणं

इंडियन एक्सप्रेस या वेबसाइटला डॉक्टर मनीष जैन डायरेक्टर ऑफ ऑन्कोलॉजी रूबी हॉल, पुणे यांनी सांगितलं की, "आजकाल लिव्हर ट्यूमर झाल्याच्या अनेक घटना तरूणींमध्ये आधीपेक्षा अधिक बघायला मिळत आहेत. जास्तीत जास्त तरूणींमध्ये NAFLD म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीज वाढत आहे. याची मुख्य कारणं लठ्ठपणा, पोषक आहाराची कमतरता आणि सुस्त जीवनशैली ही सांगता येतील. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीजमुळे लिव्हरचं जास्त नुकसान होईपर्यंत लक्षणं दिसत नाही. कारण लिव्हरमध्ये काहीही समस्या झाली तरी ते पुन्हा स्वत:ला रिपेअर करतं. ते त्याचं कार्य सुरळीतपणे करत राहतं. पण लिव्हर जास्त डॅमेज झाल्यानं कॅन्सर होतो".

महिलांच्या लिव्हरमध्ये ट्यूमर फार पुढच्या स्टेजमध्ये आढळून येतात. यासाठी काही लिव्हरसंबंधी लक्षणं कारणीभूत असतात. जसे की, सतत थकवा जाणवणे, पोटात जडपणा वाटणे किंवा वजन अचानक कमी होणे. तरूणी या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे योग्य ते निदान वेळेवर होऊ शकत नाही. अशात वेळ निघून गेलेली असते.

लिव्हर कॅन्सर होण्यासाठी हार्मोन्समध्ये बदल हेही एक कारण ठरतं. डॉक्टर सांगतात की, "गर्भनिरोधक गोळ्यांचा अधिक जास्त वापर करणं सुद्धा लिव्हरमध्ये ट्यूमर होण्याचं कारण ठरू शकतं. ज्याला हेपॅटिक अ‍ॅडेनोमस असं म्हणतात. हा ट्यूमर मोठा आणि कॅन्सरयुक्त असू शकतो. ऑटोइम्यून लिव्हर डिजीज जसे की, ऑटोइम्यून हेपेटायटिस समस्याही महिलांमध्ये फार बघायला मिळते. ज्यामुळे सुद्धा पुढे जाऊन कॅन्सर लिव्हरचा धोका वाढतो. काही केसेसमध्ये तरूण महिलांना हेपेटायटिस बी किंवा सी ची लागण होते. हे वायरस अनेकवर्ष शरीरात राहतात. पण याचा पत्ताही त्यांना नसतो. हे वायरस हळूहळू लिव्हरला डॅमेज करतात आणि पुढे जाऊन कॅन्सर होतो".

Web Title: Dipika Kakkar diagnose with stage 2 Liver Cancer, know why young women have more risk of liver cancer