Cardamom Benefits: आपल्या किचनमधील मसाल्यांमध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या पदार्थांची टेस्ट तर वाढवतातच, सोबतच आपली तब्येतही ठणठणीत ठेवतात. असाच एक मसाला म्हणजे वेलची. वेलचीचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. यानं पदार्थाला किंवा चहाला सुगंध येतो आणि टेस्टही वाढते.
वेलचीच्या आरोग्याला होणाऱ्या फायद्यांबाबत सांगायचं तर यानं शरीरातील इन्फ्लामेशन कमी होतं, शरीराला अॅंटी-मायक्रोबिअल गुण मिळतात आणि सोबतच यात अॅंटी-ऑक्सीडेंट्सही भरपूर असतात. वेलची सगळेच खातात. पण काही लोकांसाठी वेलची खूप जास्त फायदेशीर ठरते. अशा लोकांना रोज वेलची खायला हवी. डायटशिअन तमन्ना दयाल यांनी इन्स्टा व्हिडिओत सांगितलं की, कोणत्या लोकांनी रोज एक वेलची खायला हवी आणि त्याचे फायदे काय होतात.
कुणी खावी रोज एक वेलची?
१) तमन्ना दयाल यांच्यानुसार, ज्या लोकांना नेहमीच पोटासंबंधी काहीना काही त्रास असतो त्यांनी आवर्जून वेलची खायला हवी. वेलचीमुळे पचनासाठी आवश्यक एंझाइम्स स्टिम्यूलेट होतात, ज्यामुळे ब्लोटिंग आणि जडपणा दूर होतो.
२) बऱ्याच लोकांना तोंडात नेहमीच फोड येतात. अनेकदा उष्णतेमुळे असं होतं. अशा लोकांनी रोज एक वेलची खाणं फायदेशीर ठरू शकतं.
३) काही लोकांना नेहमीच घाबरल्यासारखं वाटतं, अशा लोकांनी रोज एक वेलची खायला हवी.
४) वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल, चरबी कमी करायची असेल तर त्यांनीही रोज एक वेलची खायला हवी. यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि फॅट बर्नची प्रोसेस वेगानं होते.
५) अलिकडे बऱ्याच लोकांना फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरवर सूज येण्याची समस्या होते. त्यांनी सुद्धा रोज एक वेलची खावी.
६) मासिक पाळीदरम्यान क्रॅम्प्स येतात. ही समस्या दूर करण्यास वेलची मदत करू शकते. वेलचीमुळे वेदना कमी होतात.
कशी खाल वेलची?
एक्सपर्ट सांगतात की, रोज १ ते २ वेलची खाऊ शकता. वेलची कच्ची खाऊ शकता किंवा त्याचं पाणी पिऊ शकता किंवा चहातही टाकू शकता. जेवण झाल्यावर वेलची खाणं अधिक फायदेशीर मानलं जातं. वेगवेगळ्या भाज्या, पदार्थांमध्ये वेलची टाका.