Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > घरात कुणाचंही कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर आहारात 'असा' करा बदल, न्यूट्रिशनिस्टनं सांगितले उपाय

घरात कुणाचंही कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर आहारात 'असा' करा बदल, न्यूट्रिशनिस्टनं सांगितले उपाय

Cholesterol Diet: न्यूट्रिशनिस्ट सोम्या गुप्ता यांनी अशा काही फूड्सबाबत माहिती दिली आहे. ज्याद्वारे तुम्ही बॅड कोलेस्टेरॉल कमी करू शकता.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 10:03 IST2025-06-05T10:03:17+5:302025-06-05T10:03:46+5:30

Cholesterol Diet: न्यूट्रिशनिस्ट सोम्या गुप्ता यांनी अशा काही फूड्सबाबत माहिती दिली आहे. ज्याद्वारे तुम्ही बॅड कोलेस्टेरॉल कमी करू शकता.  

Dietary changes to lower high cholesterol cholesterol home remedies | घरात कुणाचंही कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर आहारात 'असा' करा बदल, न्यूट्रिशनिस्टनं सांगितले उपाय

घरात कुणाचंही कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर आहारात 'असा' करा बदल, न्यूट्रिशनिस्टनं सांगितले उपाय

Cholesterol Diet: कोलेस्टेरॉल वाढणं ही आजकाल एक मोठी समस्या झाली आहे. कोलेस्टेरॉल एक प्रकारचं मेण असतं जे नसांमध्ये जमा होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतं. जर नसांमध्ये जास्त कोलेस्टेरॉल वाढलं तर हृदयासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा धोका अधिक वाढतो. शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं की, वेगवेगळ्या भागांमध्ये वेदना होऊ लागतात. डाग, चट्टे पडू लागतात, हृदयाच्या समस्या वाढतात आणि हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोकाही राहतो. अशात शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करणं फार गरजेचं असतं. न्यूट्रिशनिस्ट सोम्या गुप्ता यांनी अशा काही फूड्सबाबत माहिती दिली आहे. ज्याद्वारे तुम्ही बॅड कोलेस्टेरॉल कमी करू शकता.  

हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काय खावं?

तूप खा

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, जर घरात कुणाचंही कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर तूप नक्की खावं. तूपाचा तुम्ही आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश करू शकता. तूपात आढळणाऱ्या हेल्दी फॅटनं रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉलही कमी होतं.

ड्राय फ्रूट्सचे फायदे

वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ड्रायफ्रूट्स खाणंही खूप फायदेशीर ठरतं. आहारात काजू, शेंगदाणे आणि खोबऱ्याच्या समावेश करण्याचा सल्ला एक्सपर्ट देतात. यांमध्ये हृदयासाठी फायदेशीर असे अनेक तत्व असतात.

पॅकेज्ड फूडपासून रहा दूर

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, सगळ्या प्रकारचे पॅकेज्ड फूड खाणं टाळलं पाहिजे. जर या फूड्सवर हेल्दी असल्याचा टॅग असेल तरीही ते खाणं टाळलं पाहिजे. कारण पॅकेज्ड फूडमध्ये पाम ऑइल आणि व्हेजीटेबल ऑइल असतं. जे हृदयासाठी हेल्दी नसतं.

अल्कोहोल टाळा

कमी प्रमाणात जरी अल्कोहोल घेतलं तर यानं लिव्हर प्रभावित होतं. ज्यामुळे कोलेस्टेरॉल जास्त प्रोड्यूस होतं, जे शरीर मॅनेज करू शकत नाही.

वेट ट्रेनिंग महत्वाचं

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी किंवा हृदय निरोगी ठेवण्यासाठी केवळ पौष्टिक खाणं-पिणं महत्वाचं नाही तर यासाठी वेट ट्रेनिंगही गरजेचं असतं. आठवड्यातून किमान 2 वेळा वेट ट्रेनिंग गरजेचं आहे. याद्वारे ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या होतात.

Web Title: Dietary changes to lower high cholesterol cholesterol home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.