Join us

उन्हाळ्यात काय फायद्याचं दही की ताक? कशाने शरीराला मिळतात भरपूर फायदे- एक्सपर्ट सांगतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 14:24 IST

Curd Or Buttermilk Which Is More Beneficial : जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ताकाचे सेवन करू शकता. यात फॅट्स आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते.

सकाळचा नाश्ता हे पहिले मील असते. (Breakfast Recipe) यासाठी हेवी आणि हेल्दी दोन्हींची गरज असते. नाश्त्याला तळलेले, भाजलेले मसालेदार पदार्थ खाल्ले जातात. ज्यामुळे पचनतंत्र खराब होते. याशिवाय एसिडीटी, अपचन यांसारख्या समस्याही उद्भवतात. (Health Tips) काही लोक नाश्त्याला दही किंवा ताकाचे सेवन करतात. याचे सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते याशिवाय शरीरात गुड बॅक्टेरियाज तयार  झाल्याने अनेक फायदे मिळतात. नेचरक्योर इंस्टीट्यूटच्या आहारतज्ज्ञ सुष्मा पीएस यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.(Curd Or Buttermilk Which Is More Beneficial To Consume In Morning) 

सकाळच्या नाश्त्याला ताक की दही काय जास्त फायदेशीर ठरते?

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ताकाचे सेवन करू शकता. यात फॅट्स आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते. याच्या सेवनाने लवकरात लवकर वजन कमी होण्यास मदत होते. म्हणूनच मीलसोबत ताकाचे सेवनही करायला हवे ज्यामुळे लवकर भूक लागत नाही.

पोषक तत्व कशात जास्त असतात?

पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाले तर दह्यात ताकापेक्षा जास्त न्युट्रिएंट्स असतात. यात एंटी बॅक्टेरियल गुण असतात. कॅल्शियम, प्रोबायोटिक्स असतात. ज्याच्या सेवनाने शरीराला योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळतात. जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असीतल तर दह्याचे सेवन जास्त फायदेशीर ठरेल. यात मायक्रोन्युट्रिए्ंस असतात ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

शरीर हायड्रेट राहण्यास  मदत होते

शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तुम्ही ताकाचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहील. यात हायड्रेटींग गुणधर्म असतात. इलेक्ट्रोलाईट्सही  असतात. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास आणि एक्टिव्ह  राहण्यास मदत होते. जर तुम्हाला गॅस, एसिडीटीची समस्या सतावत असेल तर तुम्ही दह्यात आळशीची पावडर घालून पिऊ शकता. याव्यतिरिक्त ताकात भाजलेलं जीरं घालून पिऊ शकता. हे दोन्ही पदार्थ पचनाच्या समस्या टाळण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

या गोष्टींची काळजी घ्या

जर तुम्ही रोज याचे सेवन करत असाल तर दह्याऐवजी ताकाचा पर्याय निवडा. या पदार्थांच्या सेवनाने तुम्हाला कोणत्याही समस्या उद्भवत असतील त्वरीच याचे सेवन करणं बंद करा. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवत असतील तर याचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हेल्थ टिप्सआरोग्य