Yashasvi Jaiswal Health Disease : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वाल याची तब्येत अचानक बिघडली. 16 डिसेंबर 2025 रोजी सैयद मुश्ताक अली ट्रॉफी सुपर लीगमधील मुंबई विरुद्ध राजस्थान या सामन्यात खेळताना त्याला पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या होत्या. सामना संपल्यानंतर वेदना अधिक वाढल्याने त्याला पिंपरी-चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अशात आता त्याच्या फॅन्समध्ये त्याला झालेल्या आजाराबाबत चर्चा सुरू आहे. चला जाणून घेऊया, यशस्वीला कोणता आजार झाला आणि तो किती धोकादायक आहे.
तपासणीत काय समोर झाले?
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्याला लगेच दाखल करण्यात आले. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली. अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅन करण्यात आले. तपासणीत पोट व आतड्यांमध्ये सूज आढळली आणि अॅक्यूट गॅस्ट्रोएन्टेराइटिस असल्याचे निदान झाले. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये आणि वेदना कमी व्हाव्यात यासाठी औषधे देण्यात आली आहेत.
हा आजार काय आहे आणि का होतो?
रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अमित शर्मा यांनी सांगितले की यशस्वीला अॅक्यूट गॅस्ट्रोएन्टेराइटिस झाला आहे. हा पोटाचा संसर्गजन्य आजार असून सामान्यपणे याला “पोटाचा बग” किंवा उलटी-जुलाबाचा आजार म्हणतात. सध्या यशस्वीची प्रकृती स्थिर आहे. हा आजार प्रामुख्याने व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होतो आणि बहुतेक वेळा काही दिवसांत बरा होतो. खेळाडूंमध्ये शरीरावर जास्त ताण येत असल्याने ही समस्या लवकर गंभीर होऊ शकते, म्हणून रुग्णालयात दाखल करणे आवश्यक ठरते.
हा आजार किती धोकादायक आहे?
या आजारात पोट आणि लहान आतड्यांच्या आतल्या बाजूस सूज येते. बहुतेक वेळा हा आजार व्हायरसमुळे जसे की, नोरोव्हायरस किंवा रोटाव्हायरसमुळे होतो. कधी कधी दूषित अन्न किंवा पाण्यामुळे, तसेच बॅक्टेरियामुळेही होऊ शकतो. बऱ्याच लोकांमध्ये हा आजार 3 ते 7 दिवसांत आपोआप बरा होतो. मात्र शरीरात पाणी जास्तच कमी झालं तर झाल्यास परिस्थिती धोकादायक ठरू शकते. वेळेवर उपचार घेतल्यास हा आजार गंभीर ठरत नाही.
या आजाराची लक्षणे
पोटात तीव्र कळा व वेदना
उलटी होणे
पातळ जुलाब
सौम्य ताप
थकवा व अशक्तपणा
भूक न लागणे
