lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > स्वयंपाकासाठी तुम्हीही रिफाईंड ऑईल वापरता? डॉक्टर सांगतात, कोणतं तेल वापरणं जास्त चांगलं..

स्वयंपाकासाठी तुम्हीही रिफाईंड ऑईल वापरता? डॉक्टर सांगतात, कोणतं तेल वापरणं जास्त चांगलं..

Cooking Tips about usage of cooking oil : आहाराचे काही नियम पाळल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 11:07 AM2024-02-21T11:07:36+5:302024-02-21T11:13:40+5:30

Cooking Tips about usage of cooking oil : आहाराचे काही नियम पाळल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Cooking Tips about usage of cooking oil : Do you also use refined oil for cooking? Doctor says, which oil is better to use.. | स्वयंपाकासाठी तुम्हीही रिफाईंड ऑईल वापरता? डॉक्टर सांगतात, कोणतं तेल वापरणं जास्त चांगलं..

स्वयंपाकासाठी तुम्हीही रिफाईंड ऑईल वापरता? डॉक्टर सांगतात, कोणतं तेल वापरणं जास्त चांगलं..

तेल हा आपल्या स्वयंपाकातील एक महत्त्वाचा जिन्नस आहे. कोणत्याही पदार्थाला फोडणी देण्यासाठी, कणीक मळण्यासाठी किंवा एखादा पदार्थ तळण्यासाठी आपण तेल वापरतोच. भारतीय स्वयंपाक तर तेल आणि तूपाशिवाय केवळ अशक्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शरीरातील स्निग्धता टिकून राहण्यासाठी तेल आवश्यक असले तरी आहारात त्याचा प्रमाणाबाहेर वापर केल्यास कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा यांसारख्या समस्या निर्माण होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे तेलाचा जपून वापर करायला हवा असं आहारतज्ज्ञांकडून वारंवार सांगण्यात येते (Cooking Tips about usage of cooking oil). 

तसेच स्वयंपाकासाठी कोणते तेल, किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने वापरावे याचे काही नियम आहेत. हे नियम पाळल्यास आपण आहारात घेत असलेल्या तेलाचा त्रास होत नाही. डॉ. स्मिता भोईर पाटील यांनी स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. पाहूयात स्वयंपाकासाठी रिफाईंड तेल वापरणे का चांगले नसते आणि मग त्याऐवजी नेमके कोणते तेल वापरणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. 

(Image : Google)
(Image : Google)

रिफाईंड ऑईल वापरणे का घातक? 

आपल्यापैकी बहुतांश जण स्वयंपाकासाठी रिफाईंड ऑईलचा वापर करतात. सोयाबीन, सनफ्लॉवर, राईस ब्रान, शेंगदाणा यांसारखी रिफाईंड ऑईल वापरल्यास शरीराला त्याचे दुष्परीणाम होऊ शकतात. रिफाईंड ऑईलमुळे शरीरावर सूज येणे, डायबिटीस, हृदयरोग, हॉर्मोन्सचे असंतुलन, पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. रिफाईंड ऑईल तयार करताना बियांना खूप जास्त प्रमाणात उष्णता देऊन त्यातून तेल काढण्याची प्रक्रिया होते. या उष्णता देण्याच्या क्रियेमुळे बियांमधील पोषक तत्त्व नष्ट होतात. 

तसंच या तेलांमध्ये हेक्सेन, ब्लिचिंग, अर्थ, फॉस्फरीक अॅसिड, कॉस्टीक सोडा असे असे रासायनिक घटक मिसळले जातात. तेलाचा रंग, वास, घट्टपणा काढण्यासाठी या केमिकल्सचा वापर केला जातो. हे केमिकल्स पोटात जातात जे आरोग्यासाठी घातक असतात. तसंच या तेलात ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सूज येणे, रक्तदाब वाढणे, डायबिटीस अशा समस्या उद्भवू शकतात. 

मग रिफाईंड तेलाला पर्याय काय? 

रिफाईंड ऑईल आरोग्यासाठी घातक असल्याने ते वापरणे पूर्णपणे बंद करुन तूप किंवा घाण्याचे तेल वापरायला हवे. घाण्यावर काढलेल्या तेलावर आरोग्याला घातक ठरेल अशाप्रकारे प्रक्रिया केलेली नसते. त्यामुळे ते तेल वापरल्याने रिफाईंड तेलाइतका त्रास होत नाही. मात्र सध्या बाजारात घाण्याचे तेल म्हणून विकली जाणारी तेलं खरंच घाण्याची आहेत का याचा प्रामुख्याने विचार करायला हवा. तसंच तूप हे तर आपण घरी तयार केलेले असल्याने शक्य तेव्हा फोडणीला, पोळीवर किंवा अन्य गोष्टींसाठीही तूपाचा वापर आपण करु शकतो.   
 

 

Web Title: Cooking Tips about usage of cooking oil : Do you also use refined oil for cooking? Doctor says, which oil is better to use..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.