Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी संडास होत नाही-दिवसभर अस्वस्थ वाटतं? सकाळी उठताच १ काम करा, पोट साफ होईल

सकाळी संडास होत नाही-दिवसभर अस्वस्थ वाटतं? सकाळी उठताच १ काम करा, पोट साफ होईल

Constipation Solution : रोज सकाळी पोट साफ होण्याासाठी आपल्या डेली रूटीनमध्ये थोडे फार बदल करून तुम्ही पोटाचे आरोग्य चांगले ठेवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 15:24 IST2026-02-22T14:45:23+5:302026-02-22T15:24:50+5:30

Constipation Solution : रोज सकाळी पोट साफ होण्याासाठी आपल्या डेली रूटीनमध्ये थोडे फार बदल करून तुम्ही पोटाचे आरोग्य चांगले ठेवू शकता.

Constipation Solution : What To do First Thing In Moring To Clean Stomach Immediately | सकाळी संडास होत नाही-दिवसभर अस्वस्थ वाटतं? सकाळी उठताच १ काम करा, पोट साफ होईल

सकाळी संडास होत नाही-दिवसभर अस्वस्थ वाटतं? सकाळी उठताच १ काम करा, पोट साफ होईल

जर सकाळी उठल्यानंतर तुमचं पोट साफ होत नसेल आणि पूर्ण दिवस अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही आहाराबाबत  काळजी घ्यायला हवी. रोज सकाळी पोट साफ होण्याासाठी आपल्या डेली रूटीनमध्ये थोडे फार बदल करून तुम्ही पोटाचे आरोग्य चांगले ठेवू शकता (Constipation Home Remedies). आठवड्यातला प्रत्येक दिवस झोपेतून उठल्यानंतर जर तुम्ही हे काम केले तर तुम्हाला स्वत:हून चांगला बदल झालेला जाणवले आणि शरीर निरोगी राहण्यासही मदत होईल. (What To do First Thing In Moring To Clean Stomach Immediately)

सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या

रोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या. आयुर्वेदानुसार हे छोटंसं काम केल्यानं फक्त तुमची गट हेल्थ चांगली राहणार नाही तर ओव्हरऑल हेल्थ चांगली राहण्यासही मदत होईल. चांगल्या परिणामांसाठी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या नंतर त्वरीत बाथरूमध्ये जाऊन बसा.

गट हेल्थसाठी फायदेशीर

नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार जर तुम्ही रोज सकाळी 1 कोमट पाणी प्यायले तर पोट साफ होण्यास मदत होईल. तसंच गॅस, एसिडीटी, ब्लॉटींगची समस्या कमी होण्यासही मदत होईल. हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते कोमट पाणी प्यायल्यानं आतडे सक्रिय ठेवण्यास मदत होते. पोटात जमा झालेली घाण सहज बाहेर निघते. 

चांगल्या परिणामांसाठी पाण्यात लिंबू मिसळूनही तुम्ही पिऊ शकतात. सुरूवातीच्या काही दिवसांत तुमचं पोट व्यवस्थित साफ होणार नाही पण हळूहळू कोमट पाणी पिण्याची  सवय झाल्यानतंर रोज जेव्हा तुम्ही बाथरूमध्ये जाऊन बसाल तेव्हा व्यवस्थित मल बाहेर येण्यास मदत होईल. पण पाणी जास्त गरम करू नका. कोमट केलेलंच पाणी प्या. (Ref)

कोमट पाणी प्यायल्यानं पचनसंस्था सक्रीय होते आणि अन्नाचे पचन अधिक चांगल्या प्रकारे होते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करते. ज्यामुळे शरीर स्वच्छ राहते. नियमित कोमट पाणी घेतल्यानं पोटाची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्टतेचा त्रास दूर होण्यास मदत होते. हे शरीरातील मेटाबॉलिझ्म वाढवते. ज्यामुळे चरबी जाळण्यास मदत होते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. पोट साफ होण्याव्यतिरिकित कोमट पाण्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावडतात ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया अधिक प्रभावी होते. 

Web Title : सुबह कब्ज से राहत: आसान मल त्याग के लिए गर्म पानी पिएं।

Web Summary : सुबह कब्ज से परेशान हैं? पेट के स्वास्थ्य और मल त्याग को बेहतर बनाने के लिए रोजाना खाली पेट गर्म पानी पिएं। यह पाचन में सहायता करता है, विषहरण करता है और गैस, एसिडिटी और सूजन से राहत दिलाने में मदद करता है। बेहतर परिणामों के लिए नींबू मिलाएं। लगातार उपयोग से नियमित और आसान मल त्याग को बढ़ावा मिलता है।

Web Title : Morning constipation relief: Drink warm water for easy bowel movement.

Web Summary : Struggling with morning constipation? Drink warm water daily on an empty stomach to improve gut health and bowel movements. It aids digestion, detoxifies, and helps relieve gas, acidity and bloating. Add lemon for better results. Consistent use promotes regular and easy bowel movements.