Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Noro Virus : सावधान! कोरोनानंतर नवं संकट; जीवघेण्या नोरो व्हायरसचा १०३ मुलांना विळखा, 'ही' आहेत लक्षणं

Noro Virus : सावधान! कोरोनानंतर नवं संकट; जीवघेण्या नोरो व्हायरसचा १०३ मुलांना विळखा, 'ही' आहेत लक्षणं

Noro Virus : एका सिनियर हायस्कूलमधील १०३ विद्यार्थी नोरो व्हायरसने संक्रमित आढळले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 15:10 IST2026-01-18T15:09:35+5:302026-01-18T15:10:02+5:30

Noro Virus : एका सिनियर हायस्कूलमधील १०३ विद्यार्थी नोरो व्हायरसने संक्रमित आढळले आहेत.

china on alert after covid as noro virus spreads in school 103 students fall sick know all about it | Noro Virus : सावधान! कोरोनानंतर नवं संकट; जीवघेण्या नोरो व्हायरसचा १०३ मुलांना विळखा, 'ही' आहेत लक्षणं

Noro Virus : सावधान! कोरोनानंतर नवं संकट; जीवघेण्या नोरो व्हायरसचा १०३ मुलांना विळखा, 'ही' आहेत लक्षणं

कोरोना महामारीनंतर आता चीनमध्ये दुसऱ्या एका व्हायरसने शिरकाव केला आहे. दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील फोशान शहरात असलेल्या एका सिनियर हायस्कूलमधील १०३ विद्यार्थी नोरो व्हायरसने संक्रमित आढळले आहेत. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सर्व विद्यार्थी सुरक्षित असून कोणतीही केस गंभीर किंवा जीवघेणी नाही. नोरो व्हायरस हा असा व्हायरस आहे ज्यामुळे 'अक्यूट गॅस्ट्रोएन्टेरिटिस' होतो. यामध्ये प्रामुख्याने उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणं दिसतात. शिन्हुई मिडल स्कूलमधील या विद्यार्थ्यांमध्ये नुकतीच अशी लक्षणं दिसून आली होती, ज्यांच्या प्राथमिक तपासणीत नोरो व्हायरस संसर्गाची पुष्टी झाली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सर्व १०३ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा परिसर पूर्णपणे निर्जंतुक करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात असून त्यांच्या उपस्थितीवरही देखरेख ठेवली जात आहे. याव्यतिरिक्त, संसर्गाच्या सोर्सचा शोध घेण्यासाठी महामारी विज्ञान सर्वेक्षण सुरू आहे. ग्वांगडोंग प्रांताच्या रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी सांगितलं की, येथे दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च दरम्यान नोरो व्हायरसची प्रकरणं वाढतात. हा व्हायरस विशेषतः थंडीच्या दिवसात वेगाने पसरतो.

काय आहे नोरो व्हायरस? 

नोरो व्हायरस हा जगभरातील अत्यंत सामान्य व्हायरस मानला जातो. दरवर्षी याचे सुमारे ६८.५ कोटी रुग्ण आढळतात, ज्यामध्ये ५ वर्षांखालील साधारण २० कोटी मुलांचा समावेश असतो. जगभरात हा व्हायरस दरवर्षी सुमारे २ लाख लोकांचा बळी घेतो, ज्यामध्ये ५० हजार मुलं असतात. याचा सर्वाधिक परिणाम कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये दिसून येतो. आरोग्य सेवा आणि आर्थिक नुकसान मिळून नोरो व्हायरसमुळे होणारा जागतिक खर्च अंदाजे ६० अब्ज डॉलर्स इतका आहे. नोरो व्हायरसचा पहिला प्रादुर्भाव १९६८ मध्ये अमेरिकेच्या ओहायो राज्यातील नॉरवॉक शहरात नोंदवला गेला होता. 

हा व्हायरस कसा पसरतो? 

हा व्हायरस गॅस्ट्रोएन्टेरिटिस निर्माण करतो, ज्याला सामान्य भाषेत अनेक लोक 'स्टमक फ्लू' म्हणतात. मात्र हा नेहमीच्या फ्लू पेक्षा वेगळा आहे, कारण इन्फ्लूएंझा व्हायरस श्वसनाचे आजार निर्माण करतो, पोटाचे नाही. नोरो व्हायरस सहसा दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे पसरतो. संक्रमित व्यक्तीच्या हाताने स्पर्श केलेले अन्न, अर्धवट शिजवलेले शेलफिश किंवा अशुद्ध पाण्याने धुवलेली फळे आणि भाज्या यामुळे याचा धोका वाढतो. हा व्हायरस दरवाजाचं हँडल, नळ आणि काउंटर सारख्या पृष्ठभागांवर दोन आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकतो.

बचाव कसा करावा? 

'न्यूयॉर्क टाइम्स'च्या (NYT) रिपोर्टनुसार, यावर कोणतीही प्रभावी लस उपलब्ध नाही, त्यामुळे खबरदारी हाच सर्वात मोठा उपाय आहे. बचावासाठी साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त हँड सॅनिटायझर या व्हायरसवर प्रभावी ठरत नाही. तसेच बाथरूम आणि वारंवार स्पर्श होणाऱ्या जागा ब्लिच मिश्रित पाण्याने स्वच्छ कराव्यात. जर कोणाला संसर्ग झाला असेल, तर त्यांनी घरी विश्रांती घ्यावी. पाणी, सूप आणि इलेक्ट्रोलाईट ड्रिंक्स फायदेशीर ठरतात.
 

Web Title : नोरोवायरस का प्रकोप: चीन में 103 छात्र संक्रमित; लक्षण और बचाव

Web Summary : चीन में नोरोवायरस के प्रकोप से 103 छात्र संक्रमित, उल्टी-दस्त की शिकायत। कोई टीका नहीं; बचाव के लिए हाथ धोना, सतहों को कीटाणुरहित रखना ज़रूरी। दूषित भोजन से फैलता है।

Web Title : Norovirus Outbreak: 103 Students Infected in China; Symptoms and Prevention

Web Summary : A Norovirus outbreak in China has infected 103 students, causing vomiting and diarrhea. No vaccine exists; prevention relies on handwashing and disinfecting surfaces. The virus spreads via contaminated food and surfaces, affecting millions globally.