Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > साध्या सर्दी, खोकल्यामुळे खराब होतेय मुलांची श्रवणशक्ती; कानाचं आरोग्य चांगलं ठेवायचं तर.....

साध्या सर्दी, खोकल्यामुळे खराब होतेय मुलांची श्रवणशक्ती; कानाचं आरोग्य चांगलं ठेवायचं तर.....

Children's hearing is deteriorating due to simple cold : सर्दीमुळे कानात संसर्ग होऊ शकतो, त्याबरोबरीनेच कानाच्या आतील भागात गंभीर वेदना होऊ लागतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 08:28 PM2022-12-21T20:28:43+5:302022-12-21T20:33:17+5:30

Children's hearing is deteriorating due to simple cold : सर्दीमुळे कानात संसर्ग होऊ शकतो, त्याबरोबरीनेच कानाच्या आतील भागात गंभीर वेदना होऊ लागतात.

Children's hearing is deteriorating due to simple cold, cough; If you want to keep your ears healthy... | साध्या सर्दी, खोकल्यामुळे खराब होतेय मुलांची श्रवणशक्ती; कानाचं आरोग्य चांगलं ठेवायचं तर.....

साध्या सर्दी, खोकल्यामुळे खराब होतेय मुलांची श्रवणशक्ती; कानाचं आरोग्य चांगलं ठेवायचं तर.....

हल्ली हवामानात सतत होत असलेले बदल आणि प्रदूषण यामुळे मुलांना सर्दी व अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (URTIs) असे त्रास सर्रास होतात. तसे पाहायला गेले तर साध्या सर्दीने फारसे काही नुकसान होत नाही आणि साधारण एका आठवड्याभरात ती बरी होते. पण कधीकधी सतत सर्दी होत राहिली आणि तिचे निदान केले गेले नाही तर त्यामुळे श्रवणशक्तीचे नुकसान होऊ शकते. (Children's hearing is deteriorating due to simple cold, cough; If you want to keep your ears healthy)

सर्दीमुळे कानात संसर्ग होऊ शकतो, त्याबरोबरीनेच कानाच्या आतील भागात गंभीर वेदना होऊ लागतात. कानातील संसर्ग जर खूप आधी लक्षात आला तर तो ठीक करता येतो आणि मुलांची श्रवणशक्ती देखील पूर्ववत होऊ शकते. अखंड सर्दी आणि मुलांची श्रवणशक्ती यातील संबंध समजून घेतल्यास तुम्हाला ही परिस्थिती टाळण्यात मदत मिळू शकते. डॉ समीर डी भोबे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (कन्सल्टन्ट ईएनटी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई)

साधी सर्दी आणि श्रवणशक्तीचे नुकसान यांच्यातील संबंध नेमका काय आहे?

मुलांच्या नेजल कॅव्हिटीजच्या (अनुनासिक पोकळी) मागे ऍडिनॉइड्स किंवा टिश्यूज असतात जे टॉन्सिल्ससारखे दिसतात. सर्दी झाल्यावर हे टिश्यूज सुजतात आणि युस्टेशियन नलिका (ग्रसनी-कर्ण नलिका) ब्लॉक होते. युस्टेशियन नलिका अनुनासिक पोकळीची मागील बाजू कानाशी जोडते आणि वयस्कर व्यक्तीच्या तुलनेत मुलांमध्ये ती अधिक मोठी/अधिक छोटी/अधिक आडवी असल्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे नाकातील श्लेष्मा कानापर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे वेगवेगळे संसर्ग होऊ शकतात. या संसर्गावर जर उपचार करण्यात आले नाहीत तर श्रवणशक्तीचे नुकसान होऊ शकते. मुलांना ग्ल्यु इयर या संसर्गाचा धोका सर्वात जास्त असतो.

ग्ल्यु इयर 

साध्या सर्दीवर वेळेत प्रभावी उपचार केल्याने, कानातील श्लेष्मा साफ केला किंवा परतवला जाऊ शकतो. जर श्लेष्मा कानातून वेळीच दूर केला गेला नाही तर तो वाढत जातो आणि त्याचे रूपांतर ग्ल्युसारख्या एका पदार्थात होते. यामुळे कर्णपटलाच्या हालचालींमध्ये बाधा येते. कानातील नैसर्गिक हवेची जागा हा पदार्थ घेतो आणि त्यामुळे श्रवणशक्तीचे नुकसान होते. श्रवणशक्तीचे नुकसान, कान जड होते, कान भरलेला वाटणे हे ग्ल्यु इयरचे काही संकेत आहेत. एक महत्त्वाची टीप म्हणजे विमान टेकऑफ किंवा लॅन्ड करत असताना कानात जी संवेदना होते तीच ग्ल्यु इयरमध्ये देखील होते.

यावर काही उपाय आहे का?

कानात वेदना किंवा कान भरलेला, जड असल्याची तक्रार मुले सतत करत असतील तर त्याकडे तातडीने लक्ष द्या. त्यांना लवकरात लवकर ईएनटी डॉक्टरांना दाखवा. ऑटोस्कोपच्या साहाय्याने कानाची साधी तपासणी करून या स्थितीचे निदान करता येऊ शकते. ऑडिओग्राम करून श्रवणशक्तीमध्ये काही बिघाड झाला असल्यास, कानात द्रव जमा झाला असल्यास त्याची खात्री करून घेता येऊ शकते.

नुकसान कोणत्या टप्प्यावर पोहोचले आहे त्यानुसार उपचार करून घेता येतात, यामध्ये डीकंजेस्टंट्स, वाफ देणे, म्युकोलिटिक्स, स्टिरॉइड्स आणि नेजल स्प्रे यांचा समावेश असतो. बहुतांश केसेसमध्ये श्रवणशक्तीतील बिघाड परतवला जाऊ शकतो आणि रुग्णाला सर्वसामान्य श्रवणशक्ती आणि वेदनामुक्ती मिळू शकते. कानातील संसर्ग गंभीर असेल तर त्यावर ग्रॉमेटने उपचार करणे आवश्यक असते.

ग्रॉमेट 

ग्ल्यु इयर गंभीर स्वरूपाचे असेल आणि मूल औषधांना प्रतिसाद देत नसेल तर कानातून द्रव काढावा लागतो. कर्णपटलामध्ये एक छोटी सुई घालून द्रव बाहेर काढला जातो आणि कानामध्ये द्रवाच्या जागी हवा येऊ देईल अशी ट्यूब घातली जाते. (व्हेंटिलेटिंग ट्यूब ग्रॉमेट) जोवर युस्टेशियन नलिका बरी होत नाही आणि कान सर्वसामान्य होत नाही तोवर ही ट्यूब कानात राहते.  ज्या संसर्गांवर उपचार केले जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ऍडेनोईडेक्टॉमी किंवा सर्जरी केली जाते ज्यामध्ये मुलाच्या श्रवणशक्तीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ऍडिनॉइड्स काढून टाकावे लागतात.

खरं तर, आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे असते.  पण मुलांवर इतक्या लहान वयात काही प्रक्रिया करवून घेण्यासाठी बऱ्याचदा पालक तयार नसतात. सतत होणारी साधी सर्दी देखील उपचार केले नाहीत तर मुलांच्या श्रवणशक्तीचे नुकसान करू शकते.  त्यामुळे आजार, बिघाड लवकरात लवकर लक्षात येणे आणि त्यावर योग्य ते उपचार करवून घेतल्याने मुलांचे गंभीर नुकसान टाळता येते.

Web Title: Children's hearing is deteriorating due to simple cold, cough; If you want to keep your ears healthy...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.