Heaviness and Pain in Legs : एखादं मशीन जेव्हा जुनं होतं तेव्हा त्यात वेगवेगळी कामं निघतात. जर ही कामं निघू नये असं वाटत असेल तर वेळोवेळी मशीनची सर्व्हिसिंग करावी लागते, काळजी घ्यावी लागते. जर मशीनमध्ये काही बिघाड झाला तर खाडखूड आवाज येऊ लागतो किंवा मशीनचं काम स्लो होतं. शरीराचंही मशीनसारखंच आहे. वाढत्या वयात शरीरात वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. काहीही गडबड झाली की, शरीर वेगवेगळे संकेत देऊ लागतं. महिलांमध्ये तर अनेक समस्या दिसू लागतात. त्यातील एक कॉमन समस्या म्हणजे पाय जड वाटणं. अनेकदा अचानक पाय जड वाटू लागतात. अशात मग चालणं-फिरणंही बरंच अवघड होतं. अनेकदा तर पायांवर सूजही येते. पोटऱ्यांमध्ये जोरात वेदना होऊ लागतात. या समस्येची कारणं वेगवेगळी असू शकतात. जर आपल्याला सुद्धा अनेकदा या समस्या जाणवत असतील तर यांकडे कानाडोळा अजिबात करू नका. याची नेमकी कारणं काय आहे हे माहीत असायला हवेत, त्यानंतर योग्य ते उपाय करावे.
पाय जड वाटण्याची, दुखण्याची कारणं
ब्लड सर्कुलेशन जर सुरळीत नसेल तर पाय जड वाटू शकतात.
व्हेरिकोज व्हेन्स किंवा कमजोर नसांमुळे वेदना आणि सूज वाढते.
स्नायू कमजोर असेल किंवा पोषणाची कमी असेल तर थकवा जाणवतो.
कंबर किंवा मणक्याच्या समस्येमुळे पायांमध्ये ताण आणि झिणझिण्या जाणवतात.
डायबिटीस आणि जास्त वजनामुळे पायांवर अधिक दबाव पडतो.
जास्त वेळ पाय हवेत लटकवून बसल्याने पाय जड वाटू शकतात.
प्रवासात जास्त वेळ बसून राहिल्याने रक्ताचा फ्लो खालच्या बाजूने अधिक वाढल्यानेही असं होतं.
काय कराल उपाय?
- पाय जर नेहमीच जड वाटत असतील किंवा वेदना होत असतील तर पायांचा हलका व्यायाम करा. व्यायाम केल्याने ब्लड सर्कुलेशन सुरळीत होतं आणि पायांना आराम मिळतो. वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रेचिंग केल्याने पाय मोकळे होतात.
- पोटऱ्यांचं दुखणं कमी करण्यासाठी योगा करू शकता. वेगवेगळ्या पायांच्या आसनांनी पायांना आराम मिळतो. पायांवरील सूज कमी होते आणि दुखणंही कमी होतं.
- जर जास्त वेळ बसून राहिल्याने किंवा उभे राहिल्याने पाय दुखथ असतील किंवा जड वाटत असतील तर याचं कारण खराब ब्लड सर्कुलेशन असू शकतं. अशात पायांखाली उशी ठेवा आणि जरा उंच करा. यानेही आराम मिळू शकतो.
व्हिटामिनची कमतरताही वाढवतात दुखणं
पायांचं दुखणं किंवा जडपणा कमी करण्यासाठी आपल्या पोश्चरवर लक्ष दिलं पाहिजे. नियमित हलका व्यायाम करा आणि योगा करा. जेणेकरून ब्लड सर्कुलेशन सुरळीत होईल. त्याशिवाय आहारात आयर्न, मॅग्नेशिअम आणि व्हिटामिन बी १२ चा समावेश असावा. हे व्हिटामिन्स कमी झाल्यावरही पायांचं दुखणं वाढतं. जर त्रास जास्तच असेल तर डॉक्टरांना दाखवा.
Web Summary : Heavy legs can stem from poor circulation, varicose veins, weak muscles, or spinal issues. Diabetes, weight, prolonged sitting also contribute. Exercise, yoga, elevating legs, and a vitamin-rich diet can help alleviate the discomfort. Consult a doctor if pain persists.
Web Summary : पैरों में भारीपन खराब परिसंचरण, वैरिकाज़ नसों, कमजोर मांसपेशियों या रीढ़ की समस्याओं के कारण हो सकता है। मधुमेह, वजन और लंबे समय तक बैठे रहने से भी योगदान होता है। व्यायाम, योग, पैरों को ऊपर उठाने और विटामिन से भरपूर आहार से असुविधा को कम किया जा सकता है। दर्द बने रहने पर डॉक्टर से सलाह लें।