Burning sensation while urinating : लघवी करताना वेदना, जळजळ या समस्या जाणवणे कॉमन आहे. पण अशी समस्या घेऊन लोक डॉक्टरकडे जाण्यास टाळाटाळ करतात. समस्या खूप जास्त वाढेपर्यंत याकडे दुर्लक्ष करतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की, या समस्येकडे दुर्लक्ष करून ते स्वत:चं आरोग्य खराब करून घेताहेत. महिलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. महिलांना तर याबाबत डॉक्टरांकडे जाण्याचा अधिक संकोच वाटतो. बरं ही समस्या कशामुळे होते हेही त्यांना माहीत नसतं. अशात ही समस्या कोणत्या कारणांनी होते आणि यावर काय उपाय केले पाहिजे हे पाहुयात.
का होते ही समस्या?
लघवीसंबंधीत ही समस्या महिला आणि पुरूष दोघांमध्येही बघायला मिळते. पण महिलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. मेडिकलच्या भाषेत या समस्येला डिस्यूरिया नावाने ओळखलं जातं. हे एकप्रकारचं इन्फेक्शन आहे. जे गुप्तांगामध्ये बॅक्टेरियामुळे होतं. तज्ज्ञांनुसार, सामान्यपणे ही समस्या महिलांमध्ये २० ते ५० या वयात बघायला मिळते.
काय आहेत या इन्फेक्शनची लक्षणे
असं नाही की, ही समस्या केवळ महिलांना होते. पुरूषांमध्येही ही समस्या बघायला मिळते. मूत्र मार्गाच्या माध्यमातून बॅक्टेरिया यूरिनरी सिस्टीम आणि ब्लॅडरपर्यंत पसरल्याने असं होतं. यादरम्यान प्रभावित व्यक्तीच्या लघवीतून दुर्गंधी येणे, पुन्हा-पुन्हा लघवी पास होणे, लघवीसोबत रक्त येणे, चेस्ट आणि बॅकमध्ये वेदना होणे किंवा ताप येणे अशीही लक्षणे दिसू शकतात.
काही कारणं
लघवीशी संबंधित समस्या होत असेल तर केवळ इन्फेक्शनच कारण असेल असं नाही तर स्टोनचा देखील संकेत असू शकतो. यूरिनरी सिस्टीममध्ये स्टोन झाल्यास पुन्हा पुन्हा लघवी येणे, लघवीचा रंग, भुरका, गुलाबी दिसणे, मूड चांगला नसणे, उलटी होणे, पाठीदुखी होणे, ताप येण्याचीही कारणे असू शकतात.
तसेच स्वच्छतेवर लक्ष न देणे, अस्वच्छ पब्लिक वॉशरूमचा वापर, शरीरात पाणी कमी असणे किंवा अधिक मसालेदार पदार्थ खाणे ही सुद्धा या समस्येची कारणं असू शकतात.
काही नॅचरल उपाय
नारळाचं पाणी
लघवी करताना होणारी जळजळ दूर करण्यासाठी नारळाचं पाणी सर्वात चांगला पर्याय मानला जातो. तसेच नारळाच्या पाण्याने शरीराला इतरही अनेक फायदे होतात. नारळाच्या पाण्यात भरपूर गुणकारी तत्त्व असतात. ज्यामुळे लघवी करताना होणारी जळजळ, वेदना आणि त्रासाची समस्या दूर करू शकता. ही समस्या डिहायड्रेशनमुळे होते. यात शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे जास्तीत जास्त नारळाचं पाणी प्यावे.
काकडी खा
लघवी करताना होणारी जळजळ दूर करण्यासाठी दुसरा सर्वात चांगला उपाय म्हणजे काकडी. काकडीमध्ये असलेल्या एल्कलाइन तत्वाने शरीर आतून थंड राहतं. तसेच याने पचनक्रियाही चांगली राहते. इतकेच नाही तर यात अनेकप्रकारचे अॅटी-ऑक्सिडेंट्सही असतात. त्यामुळे या दिवसात काकडी खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे काकडीचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करा.
थंड दूध
उन्हाळ्यात लघवी करताना होणारी जळजळ दूर करण्यासाठी आणखी एक चांगला पर्याय म्हणजे थंड दूध. थंड दूध प्यायल्याने शरीराचं तापमान स्थिर राहतं आणि लघवी करताना होणारी जळजळही दूर होईल. या थंड दुधात तुम्ही वेलची पावडरही मिश्रित करू शकता.
दही खा
जर तुम्हाला तुम्हाला होणाऱ्या या समस्येपासून सुटका हवी असेल तर या दिवसात भरपूर दही खावे. याने लघवी करताना होणारी जळजळही दूर होते. दह्यामध्ये शरीरातील खराब बॅक्टेरिया नष्ट करण्याची आणि चांगले बॅक्टेरिया वाढवण्याची क्षमता असते. तसेच याने योनीमध्ये संक्रमण करणाऱ्या बॅक्टेरियालाही दूर केलं जातं.
संत्री आणि लिंबू
लघवी करताना होणारी जळजळ ही समस्या दूर करताना व्हिटामिन सी असलेल्या पदार्थांचं सेवन करावं. ही समस्या दूर करण्यासाठी व्हटामिन सी असलेले पदार्थ आपल्या शरीरात अॅसिडचं प्रमाण वाढवून बॅक्टेरियाची वाढ रोखली जाते. याने इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो. फळ आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन सी असतात. त्यामुळे लिंबाचा रस, संत्री, कीवी फळ, द्राक्ष आणि आवळा ही फळे खावीत.
