Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थंडीत दही खावं की टाळावं? ९९ टक्के लोकांना माहितीच नसते दही खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

थंडीत दही खावं की टाळावं? ९९ टक्के लोकांना माहितीच नसते दही खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

Can We Eat Curd In Winter Dietician Told Curd : दही तुम्ही गूळ किंवा मधासोबत खाऊ शकता. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. रायता किंवा लस्सी ऐवजी तुम्ही दह्याचा समावेश करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:10 IST2024-12-17T19:21:10+5:302024-12-18T16:10:09+5:30

Can We Eat Curd In Winter Dietician Told Curd : दही तुम्ही गूळ किंवा मधासोबत खाऊ शकता. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. रायता किंवा लस्सी ऐवजी तुम्ही दह्याचा समावेश करू शकता.

Can We Eat Curd In Winter Dietician Told Curd Is Heat Food And You Eat During Winter According To Ayurveda | थंडीत दही खावं की टाळावं? ९९ टक्के लोकांना माहितीच नसते दही खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

थंडीत दही खावं की टाळावं? ९९ टक्के लोकांना माहितीच नसते दही खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

दही (Curd) चविष्ट असण्याबरोबरच तब्येतीसाठीही हेल्दी असते. दह्याचे नियमित सेवन केल्यानं शरीर मजबूत राहण्यास मदत होते आणि आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. दह्याचे सेवन केल्यानं पचनाच्या समस्या, कमकुववत हाडं, हाय बीपी, हृदयाचे रोग, त्वचा रोग,  इम्यूनिटी कमी होणं लठ्ठणा यांसारख्या समस्यांपासूनआराम मिळतो. (Can We Eat Curd In Winter Dietician Told Curd)

जास्तीत जास्त लोक दही थंड आहे असं मानतात. हिवाळ्याच्या दिवसांत दही खायचं की नाही असा प्रश्न अनेकाना पडतो. भारतातील प्रसिद्ध डायटिशियन भावेश गुप्ता यांनी थंडीच्या दिवसांत दही खावे की नाही याबाबत सांगितले आहे. (Can We Eat Curd In Winter Dietician Told Curd Is Heat Food And You Eat During Winter According To Ayurveda)

थंडीच्या दिवसांत दही खाण्याबाबत आयुर्वेद काय  सांगते?

भावेश सांगतात की आयुर्वेदाच्या जितक्या संहिता आहेत त्यात दह्याला उष्ण सांगितले गेले आहे. याचा अर्थ असा की दही गरम असते आणि थंडीच्या  दिवसांत दही खाल्ल्यानं आरोग्याला बरेच फायदे मिळतात. दही एक प्रोबायोटिक्स फूड आहे ज्यामुळे शरीराला हेल्दी बॅक्टेरियाज मिळतात, याशिवाय कॅल्शियम, व्हिटामीन आणि बी-१२ चा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे शरीराचे मसल्स आणि बोन्स मजबूत राहण्यास मदत होते. 

दह्यातील प्रोबायोटीक्स पचनक्रिया चांगली ठेवतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते, गॅस एसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. दह्यातील गुड बॅक्टेरियाज इम्यून सिस्टीम मजबूत ठेवतात आणि संक्रमणापासून वाचवतात. दह्यात कॅल्शियम आणि व्हिटामीन डी भरपूर असते. ज्यामुळे हाडं मजबूत राहतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका टळतो. नियमित दही  खाल्ल्यानं कोलेस्टेरॉल लेव्हल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. ज्यामुळे हृदयाच्या आजारांचा धोका टाळता येतो.


दह्यात प्रोटीन आणि कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते आणि भूकही नियंत्रणात राहते तसंच पोट बराचवेळ भरलेलं राहतं. दह्यातील प्रोबायोटीक्स मानसिक आरोग्य चांगलं ठेवतात ज्यामुळे ताण-तणाव आणि चिंता कमी होते. 

थंडीत तोंडी लावण्यासाठी करा खमंग शेंगदाण्याची चटणी; भाकरी असो की चपाती, जेवणाची वाढेल चव

दही खाण्याची योग्य पद्धत कोणती

दही  तुम्ही गूळ किंवा मधासोबत खाऊ शकता. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. रायता किंवा लस्सी ऐवजी तुम्ही दह्याचा समावेश करू शकता. फ्रिजमधलं दही खाणं टाळा. दही नेहमी रूम टेम्परेचरवर आल्यानंतरच खावं. ज्या लोकांना अस्थमा, सायनस किंवा घश्याच्या समस्या आहेत त्यांनी ऊन्हाळ्यात दही खाणं टाळायला हवं.

Web Title: Can We Eat Curd In Winter Dietician Told Curd Is Heat Food And You Eat During Winter According To Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.