Join us

कोकणात मऊभाताचा नाश्ता म्हणजे सुख! पाहा परफेक्ट मऊभात करण्याची पारंपरिक पद्धत, अस्सल कोकणी पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2025 16:55 IST

Breakfast tips special Konkan food! See the traditional method of making perfect Maubhat, an authentic Konkani dish, healthy food option : नाश्त्याला करा मऊभात. रोज खाल्ला तरी आरोग्यासाठी चांगलाच.

आजकाल आपण नाश्त्याला रोज काहीतरी वेगळा पदार्थ खातो. त्यात तळलेले, मसालेदार, प्रचंड तेलकट आणि विकतचे पदार्थ असतात. पोहे, उपमा, थालीपीठ असे पदार्थही केला जातातच. (Breakfast tips special Konkan food! See the traditional method of making perfect Maubhat, an authentic Konkani dish, healthy food option )ते नक्कीच पोटभरीचे आणि चांगले असतात. मात्र पूर्वी गावांमध्ये खास म्हणजे कोकणात नाश्त्यासाठी छान गरमागरम साधा मऊभात त्यासोबत भाजलेला पापड, मेतकूट, साजुक तुपाची धार आणि घरचे ताजे दही. हा नाश्त्याचा बेत ठरलेला असायचा. मात्र आजकाल मऊभात फक्त आजारी माणसाला खायला देतात असा समज झाला आहे. तसे नसून खरे तर हा पदार्थ पचनासाठी आणि दिवसाची सुरवात करण्यासाठी अगदी योग्य आहे. 

मऊभात हा पचायला अगदी हलका असतो. सकाळी काहीतरी साधे पोटाला त्रास न देणारे पदार्था खावेत. हे आपल्याला माहिती आहे. नाश्ता छान झाला की उष्णतेचा त्रास होत नाही. नाश्ता अनेक जण टाळतात, मात्र नाश्ता करणे फार गरजेचे असते. शरीरा ऊर्जा मिळते आणि दिवस छान जातो. भाताने वजन वाढते असे म्हटले जाते. मात्र अनेकांचे भात मुख्य अन्न आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे भात खाऊन लोकं आरोग्यदायी आयुष्य जगत आली आहेत. 

मऊभातात पाणी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील पाण्याच्या पातळीचे संतुलन राखण्यास मदत होते. उन्हाळ्यात किंवा जुलाब, उलटीसारख्या त्रासांमध्ये मऊभात खाल्ल्यास शरीराला ताकद मिळते. कोणत्याही कारणामुळे बिघडलेली पचनक्रिया सुरळीत चालावी यासाठी आहारात मऊभात असणे फायद्याचे ठरते. मऊभातातून फायबर मिळते. त्यात पाणी जास्त असल्याने पोट साफ होते. पचनक्रिया जास्त जलद होण्यासाठी मऊभात खाणे पौष्टिक ठरते. 

मऊभात हा झणझणीत किंवा जड अन्न खाल्ल्यानंतर पचनसंस्थेला फायद्याचा ठरतो. त्यामुळे रात्री किंवा दुपारी झणझणीत जेवत असाल सकाळी नाश्त्याला मऊभात खाणे योग्य ठरते. अनेक वेळा अन्न न पचल्याने अपचन किंवा गॅसेसचा त्रास होतो, अशावेळी मऊभातासोबत तूप व मीठ खाल्ल्यास पोटाला आराम मिळतो. मऊभात हा सकाळी नाश्त्यासाठी एक आदर्श, पारंपरिक, आणि पचायला अतिशय सोपा असा पदार्थ आहे. तो सहज उपलब्ध होतो, स्वस्त असतो आणि कोणत्याही विशेष तयारीशिवाय करता येतो. त्यामुळे त्याचा समावेश नियमित आहारात केल्यास शरीराला ऊर्जा, पोषण आणि पचनसंस्थेला आराम मिळतो.

टॅग्स : अन्नहेल्थ टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्यकोकण