lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हाडं कमजोर होताच शरीर देते ३ संकेत, वेळीच लक्षणं ओळखा आणि खा ‘हे’ पदार्थ

हाडं कमजोर होताच शरीर देते ३ संकेत, वेळीच लक्षणं ओळखा आणि खा ‘हे’ पदार्थ

Bone health: Tips to keep your bones healthy after 30s : तिशीआधीच हाडं खिळखिळी, ठिसूळ होऊ नये म्हणून आरोग्याला जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2024 10:52 PM2024-02-27T22:52:57+5:302024-02-27T22:53:39+5:30

Bone health: Tips to keep your bones healthy after 30s : तिशीआधीच हाडं खिळखिळी, ठिसूळ होऊ नये म्हणून आरोग्याला जपा

Bone health: Tips to keep your bones healthy after 30s | हाडं कमजोर होताच शरीर देते ३ संकेत, वेळीच लक्षणं ओळखा आणि खा ‘हे’ पदार्थ

हाडं कमजोर होताच शरीर देते ३ संकेत, वेळीच लक्षणं ओळखा आणि खा ‘हे’ पदार्थ

वय वाढत गेलं की, आजारपण शरीरात घर तयार करतात. अनुवंशिकता, दीर्घकालीन आजार, औषधोपचारांमुळे हाडांची दुखणी वाढतात. हाडांतील कॅल्शिअम आणि प्रथिने हळूहळू शोषली गेली की हाडे ठिसूळ होतात. बऱ्याचदा कमी वयातच हाडे कमजोर होतात. महिला आणि पुरुषांमध्ये हाडे ठिसूळ होण्यामागे अनेक कारणे असू शकतात (Health Care). काहींची तिशीनंतर हाडे ठिसूळ आणि कमजोर होतात (Bone Health). ज्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी, यासह इतर हाडांच्या निगडीत समस्या वाढत जातात. आपल्याकडून नकळत घडणाऱ्या चुकांमुळेही हाडे कमजोर होतात.

पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांच्या मते, 'महिलांची हाडं कमी वयात कमजोर होतात. तिशीनंतर महिलांनी आपल्या आरोग्याची आणि खासकरून हाडांची विशेष काळजी घ्यायला हवी. असे देखील काही सिग्नल आहे, जे शरीर हाडं ठिसूळ झाल्यानंतर देतात'(Bone health: Tips to keep your bones healthy after 30s).

हाडं ठिसूळ झालीत हे कसं ओळखाल?

हाडे स्वतः सांगतात

लवनीत बत्राच्या मते, हाडे स्वतःच सांगतात की ते कमजोर होत चालल्या आहेत. कोणत्याही प्रकारच्या हाडांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. महिलांनी तिशीनंतर आपल्या आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

व्हिटॅमिन डी

दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई पन्नाशीत प्रेग्नंट, कुणी केलं ट्रोल तर कुणी म्हणाले..

कॅल्शियमसोबतच शरीराला व्हिटॅमिन डीचीही गरज असते. हाडे मजबूत करण्यात  व्हिटॅमिन डी महत्वाची भूमिका बजावते. पोषणतज्ज्ञांच्या मते, सुमारे १ बिलियन लोकं व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत.

मेनोपॉज

मेनोपॉजमुळे महिलांच्या शरीरात अनेक बदल घडतात. मुख्य म्हणजे शरीरात इस्ट्रोजन हार्मोनचे तयार होण्याचे प्रमाण कमी होते, जे हाडे मजबूत ठेवण्याचे काम करतात.

काय म्हणता? डाळी खाल्ल्याने वजन घटते? नियमित खा ३ पैकी १ डाळ, तज्ज्ञ सांगतात..

हाडांच्या मजबुतीसाठी काय खावे?

हाडे मजबूत करण्यासाठी आपण तूप, तीळ, भोपळ्याचे दाणे, अळशीच्या बिया, डिंक, हळद आणि राजगिरा या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. या सर्व गोष्टींमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. यासह आपण आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या प्रोटीन्स, दुग्धजन्य पदार्थ यासह ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करू शकता.

Web Title: Bone health: Tips to keep your bones healthy after 30s

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.