आपल्या नेहमीच्या डेली लाईफमध्ये धावपळ करताना शरीराच्या एखाद्या भागात दुखणं ही आपल्यासाठी अगदीच कॉमन समस्या झाली आहे. कधी थकव्यामुळे तर कधी चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे अंगदुखी जाणवते आणि आपण 'पेनकिलर' घेऊन किंवा त्याकडे दुर्लक्ष करुन कानाडोळा करतो. परंतु प्रत्येक वेदना ही कॉमन नसते. आपले शरीर आपल्याला अनेकदा वेदनांच्या माध्यमातून काही अंतर्गत आजारांचे संकेत देत असते. विशेषतः शरीराच्या ५ विशिष्ट भागांमधील वेदना या आरोग्याच्या मोठ्या संकटाची पूर्वसूचना असू शकतात. या वेदनांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर त्याचे रूपांतर गंभीर आजारात होऊ शकते(5 pains you should never ignore).
अनेकदा आपण म्हणतो, "थोडं डोकं तर दुखतंय, होऊन जाईल नीट!" किंवा "पाठदुखी तर नॉर्मल आहे." पण हीच 'कॉमन' वाटणारी गोष्ट एखाद्या वेळी गंभीर ठरु शकते. प्रत्येक वेदना ही साधीच असते असं नाही; काही वेळा ती शरीराकडून दिला जाणारा गंभीर इशाराही असू शकतो. विशेषतः शरीराच्या काही ठराविक भागात सतत किंवा तीव्र (body pain that indicates serious illness) वेदना होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. शरीरातील असे कोणते ५ महत्त्वाचे भाग आहेत, जिथे वेदना झाल्यास ती कधीही दुर्लक्षित करू नये, तसेच त्यामागील कारणं आणि वेळेवर काळजी (pains you should never ignore) घेण्याचं महत्त्व नेमकं काय ते पाहूयात.
शरीराच्या 'या' ५ भागांतील वेदना चुकूनही समजू नका नॉर्मल...
१. तीव्र डोकेदुखी (Severe Headache) :- डोकेदुखी ही एक अतिशय कॉमन समस्या आहे. आपल्यापैकी बहुतेकांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो. अनेकदा आपण याला नॉर्मल समजून त्याकडे दुर्लक्ष करतो आणि एखादी पेनकिलरची गोळी किंवा औषध घेऊन डोकेदुखी शांत करतो. परंतु, ही सवय चुकीची आहे. जर अचानक खूप तीव्र डोकेदुखी सुरू झाली, जसे की डोकं ठणकतंय अस वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. यामागचे कारण मेंदूमध्ये रक्तस्त्राव, मेंदूची रक्तवाहिनी फुगणे किंवा ब्रेन ट्यूमर देखील असू शकतो. अशा परिस्थितीत, उशीर न करता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
२. छातीत दुखणे (Chest Pain or Pressure) :- अनेकदा आपल्याला छातीत दुखण्याचा त्रास होतो किंवा काहीतरी टोचल्यासारखे वाटते. अशा वेळी आपल्याला वाटते की हे नॉर्मल आहे किंवा गॅस झाला असेल परंतु, हे अनेकदा गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. जर तुम्हाला छातीत दुखणे, दबाव जाणवणे, जकडल्यासारखे वाटणे किंवा छातीमध्ये जडपणा जाणवत असेल आणि या वेदना हळूहळू तुमची मान, जबडा, खांदा, हात किंवा पोटापर्यंत पसरत असेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे हार्ट अटॅक, हृदयाशी संबंधित इतर समस्या किंवा फुफ्फुसांच्या आजाराचे लक्षण असू शकते.
१० दिवस गुळाचा चहा प्या-तब्येतीत दिसतील ५ बदल, चहा प्या आणि करा स्वत:चा मेकओव्हर...
३. कंबरेच्या खालच्या भागात किंवा खांद्यांच्या मध्ये होणाऱ्या वेदना (Lower Back or Shoulder Blade Pain) :- जर तुम्हाला ताप येण्यासोबतच कंबरेच्या खालच्या भागात सतत वेदना होत असतील, तर याला 'नॉर्मल' समजून दुर्लक्ष करण्याची चूक मुळीच करू नका. हे किडनी इन्फेक्शन (मूत्रपिंडाचा संसर्ग) किंवा काहीवेळा हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. विशेषतः जर ही वेदना अचानक वाढली असेल, तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
४. पोटात तीव्र वेदना होणे (Severe Abdominal Pain) :- अनेकदा पोटदुखीच्या समस्येला आपण फार हलक्यात घेतो. पण पोटात होणारी तीव्र, सततची किंवा हळूहळू वाढत जाणारी वेदना एखाद्या गंभीर समस्येचा इशारा असू शकते. हे अपेंडिसायटिस (Appendicitis), पित्ताशयातील खडे (Gallbladder Stone), स्वादुपिंडाला आलेली सूज किंवा आतड्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे असू शकते. जर पोटदुखीसोबत तुम्हाला उलट्या होणे, ताप येणे किंवा पोट फुगल्यासारखे वाटत असेल, तर घरगुती उपाय शोधण्याऐवजी लगेच डॉक्टरांकडे जाणे फायद्याचे ठरेल.
प्रत्येक कॉन्फिडंट व्यक्तीला असतात ५ सवयी, पाहा तुम्हाला आहेत का? आत्मविश्वास वाढवायचा तर...
५. एकाच पायाला वेदना आणि सूज येणं (Pain and Swelling in One Leg) :- अनेकदा लोक तक्रार करतात की त्यांच्या एकाच पायात खूप वेदना होत आहेत किंवा पाय सुजल्यासारखा वाटतोय. आपण सहसा एखादी गोळी घेतो आणि वेदना कमी करण्याचा प्रयत्न करतो पण असे करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. जर तुमच्या एका पायात अचानक वेदना सुरू झाल्या, सूज आली तर हे रक्ताची गाठ (Blood Clot) तयार झाल्याचे लक्षण असू शकते. ही रक्ताची गाठ रक्तप्रवाहातून फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकते, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
