Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दिवाळीत भरपूर गोडधोड आणि फराळ खाऊन पोट बिघडलंय? पाहा बॉडी डिटॉक्सचे सोपे उपाय!

दिवाळीत भरपूर गोडधोड आणि फराळ खाऊन पोट बिघडलंय? पाहा बॉडी डिटॉक्सचे सोपे उपाय!

Body Detox After Diwali Tips : दिवाळीनंतर काही खास गोष्टी खाऊन-पिऊन आपणं बॉडी डिटॉक्स करू शकता. अशाच काही गोष्टींबाबत पाहुयात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 10:03 IST2025-10-23T10:01:59+5:302025-10-23T10:03:11+5:30

Body Detox After Diwali Tips : दिवाळीनंतर काही खास गोष्टी खाऊन-पिऊन आपणं बॉडी डिटॉक्स करू शकता. अशाच काही गोष्टींबाबत पाहुयात.

Body detox foods and drinks to take post diwali | दिवाळीत भरपूर गोडधोड आणि फराळ खाऊन पोट बिघडलंय? पाहा बॉडी डिटॉक्सचे सोपे उपाय!

दिवाळीत भरपूर गोडधोड आणि फराळ खाऊन पोट बिघडलंय? पाहा बॉडी डिटॉक्सचे सोपे उपाय!

Body Detox After Diwali Tips : दिवाळी हा सण जरा दिव्यांचा असतो, तसाच तो फराळ, मिठाई, वेगवेगळे गोडधोड पदार्थ खाण्याचा आनंद लुटण्याचा देखील असतो. सगळेच दिवळीत फराळ किंवा मिठाईवर ताव मारत असतात. पाचही दिवस खाण्याची चंगळ असते. पण याच दिवसात पोटासंबंधी किंवा पचनासंबंधी काहीबाही समस्याही होत राहतात. कधी कुणाचं पोट दुखतं, तर कधी कुणाला अपचन होतं. अशात दिवाळीनंतर काही खास गोष्टी खाऊन-पिऊन आपणं बॉडी डिटॉक्स करू शकता. अशाच काही गोष्टींबाबत पाहुयात.

लिंबू

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन सी असतात. याने तुम्हाला सर्दी-खोकल्यापासून आराम मिळेल. सोबतच पचनक्रियेसाठीही लिंबू फायदेशीर ठरतं, लिंबाच्या आंबट चवीने बाइल ज्यूसचा फ्लो वाढतो आणि याने पचनक्रिया सुरूळीत होते. लिंबाच्या सालीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट असतात ज्याने डिटॉक्सिफिकेशन होतं. 

कोथिंबीर

कोथिंबिरीच्या दाण्यामुळेही पचनक्रिया सुधारते आणि कोलेस्टेरॉल लेव्हलही नियंत्रणात राहते. तर याच्या पानांमुळे शरीरात जमा असलेलं हेवी मेटलही डीटॉक्स होतं. कोथिंबीर तुम्ही सलाद, डाळ आणि भाजीमध्ये टाकून खाऊ शकता. तसेच याची चटणीही करु शकता.

टोमॅटो

टोमॅटोमुळेही शरीराचं स्टिस्टम चांगलं होऊन डिटॉक्स होतं. उत्सावाच्या दिवसात जास्त हेवी जेवण झालं असेल तर तुम्ही टोमॅटो सूप किंवा सलाद खाऊ शकता. याने तुम्हाला हलकं वाटेल.

दही

या दिवसात एक वाटी दही खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. दह्यामध्ये प्रोबायॉटिक्स असतात, ज्याने शरीराला पचनक्रिया सुधारणारे लाभदायक बॅक्टेरिया मिळतात. याने खाल्लेलंही लवकर पचण्यास मदत होते. 

ग्रीन टी

ग्रीन टी चे अनेक फायदे तुम्हालाही माहीत असतीलच. हा चहा सुद्धा एक चांगला डीटॉक्सिफाइंग एजंट आहे. याने तुमच्या शरीरातील हानिकारक तत्त्वे बाहेर निघतात. यात डिटॉक्स एजंट असणारं कॅटेचिन आढळतं जे लिवरच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. 

Web Title : दिवाली के बाद पेट की गड़बड़? ये आसान बॉडी डिटॉक्स उपाय आजमाएं!

Web Summary : दिवाली में ज़्यादा खाने से परेशान? नींबू, धनिया, टमाटर, दही और ग्रीन टी से डिटॉक्स करें। ये पाचन सुधारते हैं, विषैले पदार्थ निकालते हैं, और पेट को स्वस्थ करते हैं।

Web Title : Beat Diwali Bloat: Simple Body Detox Tips After Festive Feasting

Web Summary : Overindulged this Diwali? Detox with lemon, coriander, tomatoes, yogurt, and green tea. These aid digestion, eliminate toxins, and restore gut health, helping you feel lighter and healthier.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.