Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Blood Cancer Day : ब्लड कॅन्सर वाढत असल्याची छोटी छोटी लक्षणं, वेळीच ओळखा उपचार घ्या!

Blood Cancer Day : ब्लड कॅन्सर वाढत असल्याची छोटी छोटी लक्षणं, वेळीच ओळखा उपचार घ्या!

Blood Cancer Day : आज वर्ल्ड कॅन्सर डे निमित्त आम्ही तुम्हाला ब्लड कॅन्सरच्या काही सामान्य लक्षणांबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही वेळीच उपचार घेऊ शकाल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:11 IST2025-05-28T10:10:45+5:302025-05-28T10:11:28+5:30

Blood Cancer Day : आज वर्ल्ड कॅन्सर डे निमित्त आम्ही तुम्हाला ब्लड कॅन्सरच्या काही सामान्य लक्षणांबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही वेळीच उपचार घेऊ शकाल.

Blood Cancer Day : you should know about these blood cancer's basics symptoms | Blood Cancer Day : ब्लड कॅन्सर वाढत असल्याची छोटी छोटी लक्षणं, वेळीच ओळखा उपचार घ्या!

Blood Cancer Day : ब्लड कॅन्सर वाढत असल्याची छोटी छोटी लक्षणं, वेळीच ओळखा उपचार घ्या!

Blood Cancer Day : कॅन्सर या आजारानं जीव जाणाऱ्या लोकांची संख्या जगभरात आहे. कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यातीलच एक कॅन्सर म्हणजे ब्लड कॅन्सर म्हणजेच रक्ताचा कॅन्सर (Blood Cancer). ज्याला मेडिकल भाषेत ल्यूकेमिया असंही म्हणतात. ब्लड कॅन्सरमध्येही वेगवेगळे प्रकार असतात. जास्तीत जास्त केसेसमध्ये ब्लड कॅन्सरचे सगळे प्रकार बोन मेरोपासून सुरू होतात. हा सॉफ्ट टिश्यू हाडांच्या आत असतो, जिथे रक्त कोशिका तयार होतात. आज वर्ल्ड कॅन्सर डे निमित्त आम्ही तुम्हाला ब्लड कॅन्सरच्या काही सामान्य लक्षणांबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही वेळीच उपचार घेऊ शकाल.

ब्लड कॅन्सरचे प्रकार

ब्लड कॅन्सरचे मुख्य प्रकार ल्यूकेमिया, लिंफोमा, मायलोइड्सप्लास्टिक सिंड्रोम (एमडीएस), मायलोप्रोलिफेरेटिव डिसऑर्डर (एमपीडी) आणि मल्टीपल मायलोमा आहे. या सगळ्यांचे शरीरावर वेगवेगळे प्रभाव बघायला मिळतात. पण काही संकेत आणि लक्षण एकसारखीच दिसतात. ज्यांकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये. चिंतेची बाब ही आहे की, बऱ्याचदा काही रूग्णांमध्ये याची लक्षणं दिसत नाहीत. चला जाणून घेऊ काही लक्षण...

खोकला किंवा छातीत वेदना

ब्लड कॅन्सर झाल्यावर तुम्हाला खोकला किंवा छातीत वेदना होऊ शकते. याचं कारण प्लीहामध्ये असामान्य रक्त कोशिका तयार होणं हे आहे. असं काही जाणवलं तर लगेच डॉक्टरांना संपर्क करा.

पुन्हा पुन्हा संक्रमण होणं

जर तुम्ही सतत आजारी पडत असाल किंवा सहजपणे तुम्हाला इन्फेक्शन होत असेल, तुम्हाला लगेच ताप येत असेल आणि थंडी वाजत असेल तर वेळीच सावध व्हा. असं तुमच्या शरीरातील आजारांशी लढणाऱ्या पांढऱ्या रक्त कोशिका कमी झाल्याने होऊ शकतं.

सहज जखम होणे आणि रक्त वाहने

जर तुमच्या शरीरावर पुरळ येत असेल, खाज येत असेल, पटकन जखम होते आणि रक्त वाहत राहतं तर हा एक संकेत आहे. प्लेटलेट्स कमी झाल्याने असं होतं, ज्या अशा कोशिका आहेत ज्या रक्त घट्ट बनवण्यास मदत करतात.

भूक न लागणे

भूक न लागणे किंवा मळमळ वाटणेही ब्लड कॅन्सरचा संकेत असू शकतो. हे तुमच्या शरीरात असामान्य रक्त कोशिका तयार झाल्याने होतं. ज्यामुळे तुमच्या पोटावर दबाव पडतो.

नेहमी थकवा राहणे

सतत कमजोरी आणि थकवा ब्लड कॅन्सरचा संकेत असू शकतो. हे पुरेशा लाल रक्तपेशी नसल्याने होऊ शकतं. ज्यामुळे तुम्हाला एनीमिया होऊ शकतो. 

ब्लड कॅन्सरची इतरही लक्षणं

रात्री घाम येणे, श्वास घेण्यास समस्या, मानेच्या लिम्फ नोडमध्ये सूज, अचानक वजन कमी होणे, ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त निघणे सुद्धा ब्लड कॅन्सरची लक्षण असू शकतात. ही लक्षण दिसली तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा.

Web Title: Blood Cancer Day : you should know about these blood cancer's basics symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.