Join us

भाग्यश्री पिते ही खास कॉफी; पन्नाशीनंतरही तिशीतलं दिसण्याचं सिक्रेट, वेट लॉस करणारी कॉफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 20:52 IST

Bhagyashree recommends bullet proof coffee For weight Loss : ही कॉफी वजन कमी करण्यासाठी पोटाची चरबी घटवण्यासाठी कशी उपयुक्त ठरते, हे तिनं सांगितलं आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री (Bhaghyashree) आपल्या अभिनयामुळेच नाही तर फिटनेस आणि डाएटमुळे बरीच चर्चेत असते.  सिनेसृष्टीत सक्रिय नसली तरीही ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. अलिकडेच तिनं तिच्या दैनंदिन रूटीनमध्ये समाविष्ट असलेल्या एका खास ड्रिंकचा खुलासा केला आहे. ते म्हणजे बुलेटप्रुफ कॉफी.

ही कॉफी वजन कमी करण्यासाठी, पोटाची चरबी घटवण्यासाठी कशी उपयुक्त ठरते, हे तिनं सांगितलं आहे. अनेकजण आपल्या डाएटमध्ये या कॉफीचा समावेश करतात. ही कॉफी करण्यची सोपी पद्धत आणि फायदे समजून घेऊ. (Bhagyashree fitness tips recommends bullet proof coffee For weight Loss and belly fat)

बुलेट कॉफी कशी करतात?

बुलेटप्रुफ कॉफी हे उच्च फॅट्स आणि कमी कार्ब्स असलेले पेय आहे. हे बनवण्यासाठी ब्लॅक कॉफीमध्ये ग्रास फेड बटर किंवा शुद्ध साजूक तूप  मिसळून ब्लेंडरमध्ये फेस येईपर्यंत फेटले जाते.  यामुळे हे पेय अतिशय मलाईदार आणि क्रिमी बनते.

ही कॉफी विशेषत: किटो डाएट किंवा इंटरमिटेंट फास्टिंग करणाऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय  आहे. वजन कमी करण्यासाठी बुलेटप्रुफ कॉफी कशी मदत करते पाहूया. यामध्ये असलेल्या हेल्दी फॅट्समुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं. यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि तुम्ही अनावश्यक स्नॅकिंग करणं टाळता परिणामी कॅलरीचे सेवन कमी होते.

जेव्हा शरीराला कार्ब्स मिळत नाहीत तेव्हा हे पेय शरीराला उर्जेसाठी कार्ब्सऐवजी साठवलेली चरबी जाळण्यासाठी प्रोत्साहन देते. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. कॉफीमधील कॅफेन आणि तुपातील हेल्दी फॅट यांचा संयोग तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवतो. यातील  ऊर्जा हळूहळू आणि स्थिरपणे मिळत असल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही आणि कामावर लक्ष केंद्रीत करणं सोपं जातं.

साजूक तुपामध्ये असलेले ब्युटारेट सारखे फॅटी एसिड पचनक्रिया सुधारण्यास आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. यात सॅच्युरेडेट फॅट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे काही व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. सकाळच्या नाश्त्याऐवजी ही कॉफी प्यायल्यास शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bhagyashree's bulletproof coffee secret: Weight loss and youthful skin revealed.

Web Summary : Actress Bhagyashree reveals her secret to weight loss and youthful skin: bulletproof coffee. This coffee, with healthy fats, reduces hunger, boosts energy, and aids digestion. It's popular in keto diets, promoting fat burning for energy.
टॅग्स : हेल्थ टिप्सभाग्यश्रीआरोग्यवेट लॉस टिप्स