Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बेलाच्या पानाचे ५ जबरदस्त फायदे- श्रावणात बेलाच्या पानांना अतिशय महत्त्व आहे कारण....

बेलाच्या पानाचे ५ जबरदस्त फायदे- श्रावणात बेलाच्या पानांना अतिशय महत्त्व आहे कारण....

5 Amazing Benefits Of Bel Patra: श्रावणामध्ये बेलाच्या पानांना एवढे जास्त महत्त्व का असते, ते पाहूया..(use of bilva patra for health and skin)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2025 16:57 IST2025-08-04T16:56:47+5:302025-08-04T16:57:48+5:30

5 Amazing Benefits Of Bel Patra: श्रावणामध्ये बेलाच्या पानांना एवढे जास्त महत्त्व का असते, ते पाहूया..(use of bilva patra for health and skin)

Betel leaves are very important in Shravan becauseuse of bel patra for skin, use of bilva patra for health and skin, 5 amazing benefits of bel patra  | बेलाच्या पानाचे ५ जबरदस्त फायदे- श्रावणात बेलाच्या पानांना अतिशय महत्त्व आहे कारण....

बेलाच्या पानाचे ५ जबरदस्त फायदे- श्रावणात बेलाच्या पानांना अतिशय महत्त्व आहे कारण....

Highlightsॲक्ने, पिगमेंटेशन आणि पिंपल्स कमी करण्यासाठीही बेलाच्या पानांचा रस लावण्याचा सल्ला दिला जातो.

श्रावण महिना आला की बेलाच्या पानांना अतिशय महत्त्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारची पूजा तर बेलाच्या पानांशिवाय अपूर्णच. जोपर्यंत महादेवाच्या पिंडीला बेल वाहिला जात नाही, तो पर्यंत ती पूजा काही पुर्ण होत नाही. ज्या वनस्पतींना आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असते, त्या वनस्पती आपल्याकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातूनही अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. तुळस, बेल ही काही त्याचीच उदाहरणे (5 amazing benefits of bel patra). आता श्रावणाच्या महिन्यात बेलाच्या पानांना एवढे महत्त्व का असते ते पाहूया..(use of bilva patra for health and skin)

 

बेलाच्या पानांचे आरोग्यदायी फायदे

डॉ. श्रेय शर्मा यांनी ओन्ली माय हेल्थ यांना दिलेल्या माहितीनुसार बेलाची पानं मधुमेह, लिव्हर, मुत्राशयाचे आजार तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. बेलाच्या पानांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

शरीरातली प्रोटीन्सची कमतरता दूर करणारा चवदार उपाय- जेवणात घ्या ५ पदार्थ; भरपूर प्रोटीन्स मिळतील

त्यामुळे ते ॲण्टी कॅन्सर एजंट म्हणून ओळखले जातात. ॲसिडीटी, कॉन्स्टीपेशन, गॅसेस, पोटदुखी असे त्रास कमी करण्यासाठीही बेलाची पाने उपयुक्त ठरतात. बेलाच्या पानांमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचे सेवन करावे. मनानेच कोणतेही प्रयोग करणे टाळावे.

 

बेलाच्या पानांचे त्वचेसाठी असणारे फायदे

आरोग्यासाठी जसा बेल उपयुक्त ठरतो, तसाच तो सौंदर्याच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरतो. त्वचा मऊ, हायड्रेटेड ठेवण्यासाठी बेलाची पाने खूप उपयुक्त ठरतात. त्वचा लालसर होऊन खाज येत असेल किंवा त्वचेवर कोणतेही फंगल इन्फेक्शन झाले असेल तर अशावेळी बेलाच्या पानांचा लेप उपयोगी ठरतो.

ऐश्वर्या नारकर सांगतात अळूवडी करण्याची खास रेसिपी, बेसनाऐवजी 'हा' पदार्थ घाला; वड्या जास्त चवदार होतील

ॲक्ने, पिगमेंटेशन आणि पिंपल्स कमी करण्यासाठीही बेलाच्या पानांचा रस लावण्याचा सल्ला दिला जातो. बेलाच्या पानांचा ताजा रस काढून त्यामध्ये तुमच्या सोयीनुसार लिंबू, हळद, बेसन, तांदळाचं पीठ असे वेगवेगळे पदार्थ घालून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा आणि १० ते १२ मिनिटांची चेहरा धुवून टाकावा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल. 

 

Web Title: Betel leaves are very important in Shravan becauseuse of bel patra for skin, use of bilva patra for health and skin, 5 amazing benefits of bel patra 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.