शहरातल्या गर्दीतून प्रवास करणं म्हणजे वाटतं तितकं सोपं काम मुळीच नव्हे. आपल्यापैकी बरेचजण ऑफिसला टू व्हीलर घेऊन जातात, इतकंच काय तर कुठे जायच - यायचं म्हटलं की लगेच आपण टू - व्हीलर (Best Yoga For People Who Ride Two-Wheelers Daily) काढून सुसाट पळतो. खरंतर, एका दृष्टिकोनातून पहायला गेलं तर ही टू - व्हीलर अगदी सोयीची पडते. कधीही पटकन टू - व्हीलर काढून निघता येत किंवा ट्राफिकमध्ये देखील अगदी ( yoga poses to relieve two-wheeler pain) रस्त्याच्या कडेने देखील वाट काढत आपण जाऊ शकतो. टू - व्हीलर वापरणं जितकं सोयीचं तितकाच त्रास देखील भरपूर होतो. जर आपण सतत दीर्घकाळ टू - व्हीलर चालवत असू तर काही काळाने त्याचा ताण आपल्या अंगावर येतोच.
विशेषतः आपल्यापैकी काहीजण स्कूटर किंवा बाईक अगदी दररोज चालवतात, त्यांना मान, पाठ आणि कंबरेच्या दुखण्याचा (two-wheeler cause neck, back, and waist pain 3 yoga poses reduce pain) त्रास जाणवतो. टू - व्हीलरवर चुकीची बसण्याची पद्धत, खड्ड्यांमुळे शरीराला बसणारे हादरे, आणि शरीराच्या एका स्थितीत सतत राहणे यामुळे स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो. या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित केल्यास पुढे गंभीर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात(3 Yoga Poses To Alleviate On-The-Bike Back Pain).अशा शारीरिक त्रासांपासून आराम मिळवण्यासाठी अधिक सुरक्षित व नैसर्गिक उपाय म्हणजे 'योगासन'. फक्त काही मिनिटे दररोज योग्य पद्धतीने योगासने केली, तर ही दुखणी दूर होऊन शरीर सुदृढ राहते. टू- व्हीलर चालवणाऱ्यांसाठी फायदेशीर अशी सोपी तीन योगासन नेमकी कोणती आहेत ती पाहूयात.
टू- व्हीलर चालवणाऱ्यांसाठी फायदेशीर अशी सोपी ३ योगासन...
१. पवनमुक्तासन :- पवनमुक्तासन (Pawanmuktasana) हे एक अतिशय उपयुक्त आणि सोपं योगासन आहे, जे विशेषतः कंबर आणि पाठदुखीपासून आराम मिळवा म्हणून केले जाते. हे आसन केल्याने कंबर आणि पाठीच्या स्नायूंना लवचिकता मिळते, आणि शरीराचा व पाठीच्या मणक्याचा ताण कमी होतो. पाठीवर सरळ झोपा. पाय आणि हात बाजूला पसरवून ठेवा. दोन्ही पाय गुडघ्यात वाका आणि छातीकडे ओढा. हातांनी गुडघे घट्ट धरून छातीशी लावा. श्वास सोडत डोकं उचलून नाक गुडघ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत १५ ते ३० सेकंद रहा आणि नंतर परत पूर्व स्थितीत या. हे आसन २ ते ३ वेळा करा.
२. भुजंगासन :- भुजंगासन (Bhujangasana) हे आसन मुख्यतः पाठीच्या दुखण्यावर, कंबरदुखीवर, आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी उपयोगी आहे. दररोज काही मिनिटं भुजंगासन केल्यास कंबरेचे स्नायूं मजबूत होतात व शरीराला लवचिकता, मानसिक शांतता आणि चांगली ऊर्जा मिळते. सर्वप्रथम पोटावर झोपा. दोन्ही पाय सरळ व जवळजवळ ठेवा. हात कोपरातून वाकवून छातीच्या दोन्ही बाजूला ठेवा. श्वास घेत हळूच डोकं, छाती आणि पोटाचा वरचा भाग वर उचला. कोपरे शरीराला जवळ ठेवा आणि नाभीपर्यंतच शरीर वर उचला. या स्थितीत १५ ते ३० सेकंद रहा, श्वास सोडत पुन्हा जमिनीवर या. २ ते ३ वेळा हा सराव करा.
मासिक पाळीच्या दिवसात फक्त १ मिनिट करा ‘ही’ गोष्ट, स्तनांमधला जडपणा-दुखणं होईल कमी...
३. बालासन :- बालासन (Balasana) हे आसन पाठीच्या ताणावर, मानसिक थकव्यावर आणि शरीरांतील श्वसन यंत्रणेवर सकारात्मक परिणाम करतं. यासोबतच, पाठ, मान आणि खांद्यांच्या ताणावर आराम मिळतो. वज्रासनात बसा म्हणजेच गुडघे दुमडून बसा. नंतर हळूहळू वरचं शरीर पुढे झुकवा आणि कपाळ जमिनीवर टेकवा. हात सरळ पुढे पसरा किंवा पाठीमागे देखील ठेवू शकता. डोळे बंद करा, श्वासावर लक्ष द्या आणि शरीर सैल सोडा. या स्थितीत ३० सेकंद ते २ मिनिटांपर्यंत राहा.