Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उपवास सोडताना कोणता पदार्थ आधी खावा? तज्ज्ञ सांगतात, उपवासानंतरही मिळेल भरपूर एनर्जी...

उपवास सोडताना कोणता पदार्थ आधी खावा? तज्ज्ञ सांगतात, उपवासानंतरही मिळेल भरपूर एनर्जी...

Best food after upvas for digestion : What to eat after breaking a fast : Best food to eat after fasting : उपवासा दरम्यान बराच काळ उपाशी राहिल्यानंतर, जेवताना कोणता पदार्थ आधी खावा ते पहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2025 10:05 IST2025-08-01T10:00:00+5:302025-08-01T10:05:02+5:30

Best food after upvas for digestion : What to eat after breaking a fast : Best food to eat after fasting : उपवासा दरम्यान बराच काळ उपाशी राहिल्यानंतर, जेवताना कोणता पदार्थ आधी खावा ते पहा...

Best food after upvas for digestion What to eat after breaking a fast Best food to eat after fasting | उपवास सोडताना कोणता पदार्थ आधी खावा? तज्ज्ञ सांगतात, उपवासानंतरही मिळेल भरपूर एनर्जी...

उपवास सोडताना कोणता पदार्थ आधी खावा? तज्ज्ञ सांगतात, उपवासानंतरही मिळेल भरपूर एनर्जी...

श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. श्रावण महिना म्हणजे सणवार, उत्सव, पूजापाठ, व्रत - वैक्यल्यांचा महिना. श्रावणात आपल्यापैकी बरेचजण उपवास करतात. श्रावणात येणाऱ्या सणानिमित्ताने किंवा श्रावणी शनिवार, सोमवारी अनेकांचे उपवास असतात. उपवास करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते कुणी दिवसभर (Best food after upvas for digestion)अगदी उपाशी राहून उपवास करत तर कुणी पोटभर खाऊन - पिऊन उपवास करतात. उपवास म्हटलं की साधारणतः आपण दिवभरात काही मोजकेच उपवासाचे पदार्थ खातो. दिवसभर फारसे काही न खाता आपण शक्यतो रात्रीच्या (What to eat after breaking a fast) जेवणाच्या वेळी उपवास सोडतो. परंतु उपवास सोडायचा म्हटलं की आपल्या ताटात अनेक पदार्थ असतात, सोबतच काहीतरी गोडधोड देखील असतेच(Best food to eat after fasting).

 उपवास सोडताना समोरच्या ताटात इतके पदार्थ असताना नेमका ताटातील कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा असा प्रश्न पडतो. दिवसभर फारसे काही न खाल्ल्याने रात्री प्रचंड भूक लागलेली असते, अशावेळी आपण शकयतो फारसा विचार न करता ताटातील आपला सर्वात आवडता पदार्थ खाऊन उपवास सोडतो. परंतु हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का ? दिवसभर उपाशी राहून उपवास सोडताना अगदी तुडुंब भरपेट जेवल्याने देखील पोट किंवा आरोग्याच्या लहान - सहान तक्रारी त्रास देतात. यासाठीच, दिवसभर उपवास करुन उपवास सोडताना नेमका कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल ते पाहूयात... 

उपवास सोडताना सर्वात आधी ताटातील 'हा' पदार्थ खा... 

दिवसभर उपवास करुन, उपवास सोडताना ताटातील नेमका कोणता पदार्थ सर्वातआधी खावा याबद्दल अधिक माहिती kissonki_duniya या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आली आहे. उपवास केल्यावर अनेकदा आपण दिवसभर उपाशी किंवा थोडेफार काहीतरी खाल्लेले असते. उपवासाच्या वेळी आपण दिवसभरात फारसे अन्नग्रहण केलेले नसते. त्यामुळे पोटाची पचनक्रिया अधिक जास्त प्रमाणात सुस्त होते. यामुळे अशा परिस्थितीत, उपवास सोडताना सुरुवातीलाच जर पचायला जड अन्नपदार्थ खाल्ले तर पचनक्रियेवर ताण येऊन पोटाची तब्येत बिघडू शकते.

Alu Vadi : अळूवडी करताना टाळा ‘या’ चुका, मग अळूवडी कायमच होईल परफेक्ट कुरकुरीत...

गरमागरम पोटली शेक, गॅस-ॲसिडिटी-पोट फुगण्यावर सोपा आणि असरदार उपाय-सर्वांसाठीच उपयोगी...

यासाठीच, भातासारखा हलका आहार यावेळी घ्यायचा असतो. काहीजण उपवास सोडताना सर्वात आधी दही भात देखील खातात. दह्यामध्ये असलेले उपयुक्त बॅक्टेरिया अन्नपदार्थ पचवण्यासाठी मदत करतात, याचबरोबर दह्यामध्ये उत्तम प्रतीचे फॅट्स व प्रोटीन्स असतात. यामुळे दिवसभर शरीराची झालेली झीज यामुळे भरुन निघते. उपवास सोडताना सर्वात आधी दही भात किंवा भातासारखा हलका आहार घेतल्याने पोट व आपले एकूणच आरोग्य न बिघडता उत्तम राहातं. 

Weight loss  : चपाती आणि भात बंद केल्यानं वजन कमी होतं का? तज्ज्ञ सांगतात, वजन कमी होईल पण..

उपवास सोडताना शरीराला सौम्य, पचनास हलके आणि उर्जादायक अन्नाची गरज असते. उपवासानंतर अचानक पचायला जड आणि मसालेदार अन्नपदार्थ  खाल्ल्यामुळे पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो आणि ॲसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उपवास सोडताना शरीराला हळूहळू अन्नाशी जुळवून घेणं गरजेचं असतं. यासाठी उपवास सोडताना सर्वात आधी भात खावा, जो पचनास हलका, पोषणमूल्यांनी भरलेला आणि शरीराला ऊर्जा देणारा असतो.

Web Title: Best food after upvas for digestion What to eat after breaking a fast Best food to eat after fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.