तूप (Ghee) हा पदार्थ फक्त चवीसाठी खाल्ला जाणारा नाही तर तब्येतीसाठी अमृतासमान आहे. अनेक वर्षांपासून भारतात तुपाचा समावेश आहारात केला जात आहे. चपाती, भाकरी किंवा वरण भातावर तूप घातल्याशिवाय अनेकांना जेवणच जात नाही. तुपाच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात अनेक आजारांपासून बचावसुद्धा होतो. (Benefits Of Warm Water With Ghee)
तुपाचे नियमित सेवन केल्यानं हाडं मजबूत राहता, रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पचनक्रिया चांगली राहते. आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आणि हेल्थ एक्सपर्ट बिजय जे आनंद यांनी तूपाचा उपयोग शरीरात कोणत्या पद्धतीनं काम करतो ते सांगितले आहे. गरम पाण्यासोबत तूप मिसळून प्यायल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. (Benefits Of Warm Water With Ghee For Digestion Constipation Skin And Body Detox)
पचनक्रिया चांगली राहते
सकाळी रिकाम्यापोटी गरम पाण्यासोबत तुपाचे सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. तूप एक नैसर्गिक पाचक घटक आहे. ज्यामुळे पचन अग्नी संतुलित राहण्यास मदत होते. गरम पाणी पचन तंत्रातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि टॉक्सिन्सशी लढण्यासही मदत होते
आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
तूप नैसर्गिक स्वरूपात आतड्यांना पोषण देते. ज्यामुळे मल त्याग करण्याची प्रक्रिया सुरळीत होते. ज्यामुळे पचन अग्नी संतुलित राहतो. गरम पाणी पचन तंत्रातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते.
त्वचा चमकदार दिसते
तुपातील हेल्दी फॅट्स आणि व्हिटामीन्स त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. तुप त्वचेच्या पेशींना आतून पोषण देते ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. चेहरा कोरडा होणं, डाग येणं अशा समस्या उद्भवत नाहीत. चेहरा मऊ, मुलायम दिसतो.
वजन नियंत्रणात राहतं
बऱ्याच लोकांना असं वाटतं की तूप खाल्ल्यानं वजन वाढू शकतं. पण हा चुकीचा समज आहे. रिकाम्या पोटी तूप खाल्ल्यानं शरीराचं मेटाबॉलिझ्म चांगलं राहतं. अन्न पचण्याची आणि कॅलरीज जळण्याची क्षमता सुधारते. तुपातील ओमेगा ३ आणि ओमेगा ९ दीर्घकाळ पोट भरलेलं ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे सतत भूक लागत नाही आणि तुम्ही ओव्हरइटींग टाळता. जर तुम्हाला गरम पाण्यातून तूप घ्यायचं नसेल तर तुम्ही वरण, भाजी किंवा पोळीत तूप घालून तुपाचा आहारात समावेश करू शकता.
