आपल्या शरीराचा सगळ्यात दुर्लक्षित भाग म्हणजे आपले तळपाय. काही अपवाद सोडले तर बहुतांश लोक असे असतात की जे त्यांच्या तळपायाची अजिबातच काळजी घेत नाही. तळपायाच्या स्वच्छतेकडेही काहींचे लक्ष नसते. पण या तळपायातच आपल्या शरीराच्या कित्येक नर्व्ह्जचा शेवट असतो. त्यामुळे पायांची जर योग्य काळजी घेतली तर कित्येक दुखणी बरी होऊ शकतात. त्यासाठी फक्त काही मिनिटांसाठी तळपाय एका विशिष्ट पद्धतीने पाण्यात बुडवून ठेवणं गरजेचं असतं (benefits of soaking feet in hot water). हा उपाय नेमका कसा करायचा आणि त्याने आपल्याला काय फायदे होऊ शकतात ते पाहूया..(benefits of Dipping your foot in warm water)
तळपाय काही मिनिटं पाण्यात बुडवून ठेवण्याचे फायदे
हा उपाय करण्यासाठी एका पसरट टबमध्ये गरम पाणी घ्या. पाणी तेवढंच गरम असावं जेवढं तुम्ही सहन करू शकता. या गरम पाण्यात जर तुम्ही काही काळ पाय बुडवून ठेवले तर त्याचा परिणाम थेट तुमच्या शरीरातल्या लिम्फॅटीक सिस्टिमवर होतो.
फक्त 'हे' पदार्थ खाणं बंद करा, २ आठवड्यात वजन घटून दिसू लागाल स्लिम-काही दिवसात व्हाल चवळीची शेंग
ही आपल्या शरीरातली अशी व्यवस्था असते जी तुमचं शरीर नॅचरली डिटॉक्स करण्यास मदत करते. त्यामुळे बॉडी डिटॉक्स करण्यासाठी अधूनमधून गरम पाण्यात काही मिनिटे पाय बुडवून बसावं.
जर गरम पाण्यामध्ये तुम्ही अर्धी वाटी एप्सम सॉल्ट घातलं तर त्याचा आणखी वेगळा फायदा होतो. या मीठामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं.
फक्त १० रुपयांत घरीच नॅचरली करा बोटॉक्स ट्रिटमेंट, वय वाढलं तरी त्वचा राहील तरुण- टवटवीत
त्यामुळे शरीरावरची सूज कमी होण्यास मदत होते आणि संपूर्ण शरीरच रिलॅक्स होतं. त्यामुळेच बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे की गरम पाण्यात पाय बुडवून ठेवल्यानंतर त्यांना झोप आल्यासारखं होतं. मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स होतं. स्ट्रेस आणि थकवा कमी होतो.
जर गरम पाण्यात तुम्ही थोडं व्हिनेगर घातलं तर त्यामुळे तुमच्या त्वचेची पीएच लेव्हल संतुलित राहण्यास मदत होते. त्याचाही खूप चांगला परिणाम त्वचेवर दिसून येतो. हे सगळे फायदे अनुभवायचे असतील एकदा निवांत वेळी हा प्रयोग करून बघाच..
