Navel Oiling Benefits : हिवाळ्यात थंड हवेसोबत सुखद वातावरणही असतं. मात्र या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडणे, सांधेदुखी, सर्दी–खोकला आणि पचनाच्या त्रासांसारख्या काही आरोग्यासंबंधी समस्या वाढतात. अशा वेळी आयुर्वेदात नाभीमध्ये तेल लावणे हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो, खासकरून मोहरीचं तेल. थंडीच्या दिवसांत नाभीमध्ये मोहरीचं तेल टाकणं खूप फायदेशीर ठरतं. चला तर मग, नाभीत मोहरीचं तेल घातल्याने मिळणारे फायदे जाणून घेऊया.
थंडीत नाभीत मोहरीचं तेल घालण्याचे फायदे
शरीरात उष्णता टिकून राहते
मोहरीचं तेल गरम असतं. नाभीत ते घातल्याने शरीरात उब टिकून राहते, थंडी सहन करण्याची क्षमता वाढते आणि शरीराचं तापमान संतुलित राहतं.
त्वचेचा कोरडेपणा दूर होतो
हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. नाभीत मोहरीचं तेल घातल्याने शरीराच्या आतील स्तरातून पोषण मिळते, ओलावा वाढतो आणि त्वचा मऊ व चमकदार होते.
पचन तंत्र मजबूत होतं
नाभीचा संबंध आंतड्यांशी असल्याने, रोज नाभीत मोहरीचं तेल लावून हलकी मालिश केल्याने पचन सुधारतं. अपचन, गॅस व बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होतात.
सांधेदुखी आणि सूज कमी होते
हिवाळ्यात सांधे दुखणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. मोहरीच्या तेलात नैसर्गिक सूज-प्रतिबंधक गुण असतात. नाभीतून हे गुण शरीरात जाऊन सांधेदुखी, सूज कमी करण्यात मदत करतात.
रोगप्रतिकार शक्ती वाढते
मोहरीच्या तेलात व्हिटामिन-ई, अँटी-ऑक्सिडंट्स आणि जंतूनाशक गुणधर्म असतात. यामुळे सर्दी-पडस्यासारख्या इन्फेक्शनपासून संरक्षण मिळते आणि इम्युनिटी वाढते.
झोपेची गुणवत्ता सुधारते
रात्री झोपण्यापूर्वी नाभीत मोहरीचं तेल घातल्याने शरीर रिलॅक्स होतं, नर्व्हस सिस्टम शांत होते आणि झोप अधिक चांगली, गाढ लागते.
त्वचेच्या समस्या कमी होतात
यातील जंतूनाशक गुण त्वचेवरील संसर्ग, खाज, रॅशेस यांसारख्या समस्यांपासून बचाव करतात.
कसा वापर करावा?
रोज रात्री झोपण्यापूर्वी २–३ थेंब शुद्ध मोहरीचं तेल घ्या. नाभीत घाला आणि २–३ मिनिटे हलक्या हाताने गोल-गोल मालिश करा इतकं केल्याने हिवाळ्यातील अनेक आरोग्य समस्यांवर नैसर्गिकरीत्या आराम मिळू शकतो.
