Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भोगीला बाजरीची भाकरी खाण्याच्या परंपरेचं महत्त्व काय? ५ फायदे, रोग राहतात कायम लांब

भोगीला बाजरीची भाकरी खाण्याच्या परंपरेचं महत्त्व काय? ५ फायदे, रोग राहतात कायम लांब

Benefits of having Bajra roti in winter and bhogi festival : थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं मानलं जातं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2024 02:51 PM2024-01-08T14:51:35+5:302024-01-08T16:08:06+5:30

Benefits of having Bajra roti in winter and bhogi festival : थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं मानलं जातं.

Benefits of having Bajra roti in winter and bhogi festival : What is the significance of the tradition of eating millet bread for Bhogi? 5 benefits, diseases remain forever | भोगीला बाजरीची भाकरी खाण्याच्या परंपरेचं महत्त्व काय? ५ फायदे, रोग राहतात कायम लांब

भोगीला बाजरीची भाकरी खाण्याच्या परंपरेचं महत्त्व काय? ५ फायदे, रोग राहतात कायम लांब

भोगी म्हणजेच मकर संक्रांतीचा आदला दिवस. या दिवशी महाराष्ट्रात बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि बऱ्याच भाज्या घालून केली जाणारी लेकुरवाळी भाजी करण्याची पद्धत आहे. याच्या जोडीला मूगाची खिचडी आणि कढीही केली जाते. आपल्या प्रत्येक सणाला ज्याप्रमाणे धार्मिक महत्त्वा आहे त्याचप्रमाणे आहाराच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. हे सगळे पदार्थ करण्यामागेही काही शास्त्र आहे. या काळात हे घटक शरीराला आवश्यक असल्याने आवर्जून खाल्ले जावेत हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं मानलं जातं. बाजरी ही शक्तीवर्धक असल्याने दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ती उपयुक्त ठरते (Benefits of having Bajra roti in winter and bhogi festival). 

बाजरीमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन्स, कॅलरीज, व्हिटॅमिन बी ६, कॅल्शियम, लोह हे घटक खूप जास्त प्रमाणात असतात. जे लोक वजन घटविण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी हिवाळ्यात आवर्जून बाजरीची भाकरी खावी. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी बाजरी खाणे अतिशय फायदेशीर ठरते. हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होत असेल तर ही भाकरी खाणे उपयुक्त ठरते. याशिवायही बाजरीचे बरेच फायदे असून प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता पांचाळ-शहा बाजरी खाण्याचे ५ फायदे सांगतात...

१. केसांसाठी फायदेशीर

बाजरीमध्ये बायोटीन आणि रायबोफ्लाविन हे घटक असतात. हे दोन्ही घटक थंडीच्या दिवसांत केसगळती कमी करण्यासाठी अतिशय आवश्यक असतात. त्यामुळे केसांसाठी बाजरी फायदेशीर ठरते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. बद्धकोष्ठतेवर उपयुक्त

थंडीच्या दिवसांत पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे कोठा जड होतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. बजरीमध्ये फायबर आणि लॅक्टिक ऍसिड असल्याने पोट साफ न होण्याची ही समस्या दूर होण्यासाठी बाजरी फायदेशीर ठरते. बाजरीमध्ये प्रोबायोटिक घटक असल्याने पोटाच्या समस्या दूर होण्यासाठीही चांगला फायदा होतो.

३. प्रतिकारशक्ती वाढते

बाजरीमध्ये लोह, खनिजे, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटक चांगल्या प्रमानात असल्याने प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी बाजरी खाणे उपयुक्त ठरते.

४. रक्तातील साखर राहते नियंत्रणात

बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास याची चांगली मदत होते. सद्ध्या मधुमेह ही समस्या अतिशय वाढलेली असल्याने बाजरी खाणे फायदेशीर ठरते.

५. श्वसनासाठी निगडित आजारांवर उपयुक्त

थंडीच्या दिवसांत अस्थमा, ब्रोंकायटीस यांसारख्या समस्या डोकं वर काढण्याची शक्यता असते. बाजरीमध्ये असलेले अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म अशा समस्यांवर उपाय म्हणून काम करत असल्याने श्वसनाशी निगडित समस्यांसाठीही बाजरी फायदेशीर ठरते.
 

Web Title: Benefits of having Bajra roti in winter and bhogi festival : What is the significance of the tradition of eating millet bread for Bhogi? 5 benefits, diseases remain forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.