Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > प्रोटीन-कॅल्शियमचा डबल डोस, १०० ग्रॅम मनुके ४ पदार्थांसोबत खा; रक्तही वाढेल

प्रोटीन-कॅल्शियमचा डबल डोस, १०० ग्रॅम मनुके ४ पदार्थांसोबत खा; रक्तही वाढेल

Benefits Of Eating 100 Grams Raisins Daily : थंडीच्या दिवसांत शेंगदाणे आणि मनुके खायला हवेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:26 IST2025-01-05T15:01:14+5:302025-01-07T15:26:11+5:30

Benefits Of Eating 100 Grams Raisins Daily : थंडीच्या दिवसांत शेंगदाणे आणि मनुके खायला हवेत.

Benefits Of Eating 100 Grams Raisins Daily And 4 Foods To Eat With Raisins For Anemia Muscle Power | प्रोटीन-कॅल्शियमचा डबल डोस, १०० ग्रॅम मनुके ४ पदार्थांसोबत खा; रक्तही वाढेल

प्रोटीन-कॅल्शियमचा डबल डोस, १०० ग्रॅम मनुके ४ पदार्थांसोबत खा; रक्तही वाढेल

जर मनुके योग्य पद्धतीनं खाल्ले तर तुमच्या शरीरातील कमकुवतपणा दूर होण्यास मदत होईल. अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी मनुके एक उत्तम औषध आहे. ज्या लोकांच्या शरीरात आयर्न, कॅल्शियमची कमतरता असते त्यांनी याचे रोज  सेवन करायला हवे. पण एक दिवसाला किती खावेत असा प्रश्न अनेकांना पडतो. एक निरोगी व्यक्ती रोज १०० ग्राम मनुके खाऊ शकते. एससीबीआयवर प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार रोज ८० ते ९० ग्राम मनुके खाल्ल्यानं संपूर्ण शरीराला फायदे मिळतात. अनेकांना काळजी वाटते की यामुळे ब्लड शुगर वाढू नये. (Benefits Of Eating 100 Grams Raisins Daily And 4 Foods To Eat With Raisins For Anemia Muscle Power)

मनुके कसे खावेत

मनुके ४ पदार्थांसोबत भिजवून खायला हवेत. या पद्धतीनं खाल्ल्यास  रक्तातील ग्लुकोज स्पाईक कंट्रोल करता येतो.  मनुके खाण्याच्या सोप्या पद्धती समजून घेऊ.

भाजलेले चणे आणि मनुके

मनुके नॅच्युरल शुगर, आयर्न, कॅल्शियम, बोरोन, फायबर्स देतात. दुसरीकडे भाजलेले चणे, फायबर्स, प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहेत. दोन्ही वस्तूंचे मिश्रण ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढवण्यापासून रोखतात. शरीर कमकुवत होत  नाही आणि स्टॅमिना वाढतो.

मनुके आणि बदाम

मनुके आणि बदाम तुम्ही एकत्र भिजवून खाऊ शकता. बदामात हेल्दी फॅट्स असतात ज्यामुळे मेंदू आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते. रक्त वाढवण्याबरोबरच ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. तुम्ही रिकाम्या पोटी याचे सेवन करू शकता. 

शेंगदाणे आणि मनुके खाण्याचे फायदे

थंडीच्या दिवसांत शेंगदाणे आणि मनुके खायला हवेत. यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात  ज्यामुळे मसल्स कमकुवत होत नाहीत. याशिवाय  बायोटीन्स कॉपर, नियासिन, फॉलेट, व्हिटामीन ई, फॉस्फरस, मॅग्नेशियम मिळते. ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. 

मोड आलेली कडधान्य

मोड आलेल्या कडधान्यांना स्प्राऊट्स असं म्हणतात. सकाळच्या वेळी याचे सेवन केल्यास  बराचवेळ पोट भरलेलं राहतं. पचनक्रिया चांगली राहते. पोषक तत्वांचे अवशोषण होण्यास मदत होते. याशिवाय मनुके खाल्ल्यानं शरीराला आयर्न मोठ्या प्रमाणात मिळते.

रक्त वाढवण्यासाठी मनुके खाणं उत्तम ठरतं. रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा, कमकुवतपणा, श्वास घ्यायला त्रास होणं, स्टॅमिना कमी होणं अशा समस्या उद्भवतात अशावेळी शरीर पिवळं पडू लागतं.  वेगवेगळ्या पद्धतीनं मनुके खाऊन तुम्ही या समस्यांना दूर ठेवू शकता. 

Web Title: Benefits Of Eating 100 Grams Raisins Daily And 4 Foods To Eat With Raisins For Anemia Muscle Power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.