कोरफड बऱ्याच लोकांच्या घरी कुंडीमध्ये लावलेली असते. अगदी छोट्याशा कुंडीतही खूप जास्त काळजी न घेताही कोरफड चांगली वाढते. केसांसाठी आणि त्वचेसाठी कोरफड अतिशय चांगली असते हे तर आपल्याला माहितीच आहे. बऱ्याच जणी ॲलोव्हेरा जेलही निमयितपणे वापरतात. कोरफड जशी सौंदर्य टिकविण्यासाठी मदत करते, तशीच ती अतिशय आरोग्यदायीही आहे. विशेषत: महिलांना मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास कमी करण्यासाठी कोरफड खूप फायदेशीर ठरते. त्यासाठी कोरफडीचा गर कशा पद्धतीने खायला हवा आणि त्यामुळे नेमके कोणकोणते लाभ होतात ते पाहूया.(how to get rid of menstrual pain, pcod and pcos?)
कोरफडीचा गर खाल्ल्यास कोणते त्रास कमी होऊ शकतात?
कोरफडीचा गर खाण्याचे नेमके कोणकोणते फायदे आहेत, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आयुर्वेद अभ्यासकांनी hitaayurveda या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगतात की कोरफडीला घ्रीतकुमारी असं देखील म्हणतात.
Vitamin B12 वाढवणारे ५ पदार्थ-रोज १ तरी खा, उदास मूड-अंगदुखी होईल गायब
कारण तरुण मुलींच्या मासिक पाळीच्या अडचणी कमी करण्यासाठी कोरफड खूप उपयुक्त ठरते. हल्ली खूप जणींचा मासिक पाळीचा त्रास वाढलेला आहे. तो कमी करण्यासाठी कोरफड निश्चित मदत करते. अनेकजणींची पाळी नियमित नसते. किंवा नियमित असली तरी त्या दिवसांत खूप पोट दुखतं. याशिवाय पीसीओडी, पीसीओएस असा त्रासही खूप जास्त वाढलेला आहे. अशा सगळ्याच समस्या कमी करण्यासाठी कोरफड खाणं फायदेशीर ठरतं..
कोरफड खाण्याची योग्य पद्धत कोणती?
बाजारात मिळणाऱ्या ॲलोव्हेरा जेलमध्ये किंवा ॲलोव्हेरा ज्यूसमध्ये अनेक केमिकल्स, प्रिझर्व्हेटीव्ह असतात. त्यामुळे जर तुमच्याघरी कोरफड असेल तर तिचाच वापर करा, असा सल्लाही एक्सपर्ट देतात.
वजन तर वाढतंय पण थंडीत व्यायाम करायचा कंटाळा? १५ मिनिटांचा सोपा व्यायाम- वजन उतरेल भराभर
यासाठी कोरफडीचा एक तुकडा तोडून घ्या. त्यानंतर तो १५ ते २० मिनिटे तसाच राहू द्या. त्यामधला पिवळा पदार्थ निघून जाऊ द्या. यानंतर तो स्वच्छ धुवून घ्या. त्याच्यावरचा हिरवा भाग काढून टाका आणि आतला गर पाण्यासोबत गिळून घ्या. १० ते १२ मिली जेल घेणे पुरेसे ठरते. शिवाय हा उपाय सकाळी उपाशीपोटीच करावा. हा उपाय नियमितपणे केल्यास वजन कमी होण्यासही मदत होते. गर्भवती महिलांनी हा उपाय करू नये. ही सगळी माहिती एक्सपर्टने सोशल मीडियावर शेअर केलेली असली तरीही तुमच्या डाॅक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपाय करावा.
