बरेच लोक ओरल हेल्थच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे दातांमध्ये वेदना, हिरड्यांमधून रक्त येणं, कमकुवतपणा यांसारख्या समस्या उद्भवतात. दात आणि हिरड्यांच्या समस्यांचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे अनहेल्दी खाणं, जास्त जंक फूडचं सेवन करणं, गोड पदार्थ खाणं, स्मोकींग आणि चुकीच्या पद्धतीनं दात घासणं ज्यामुळे दात व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत. (Baba Ramdev Told Desi Hacks To Remove Tooth Decay)
ज्यामुळे दात आणि हिरड्या कमकुवत होऊ लागतात. योग गुरू बाबा रामदेव यांनी एक सोपा, घरगुती उपाय सांगितला आहे. हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. ज्यामुळे दात मजबूत होण्यास मदत होईल आणि दातांचे इन्फेक्शनही कमी होईल. (How To Remove Kida From Teeth By Baba Ramdev)
दातांची किड स्वच्छ करण्यासाठी कोणता उपाय करावा?
योगगुरू बाबा रामदेव सांगतात की आघाडा ही वनस्पती ज्याला लटजीरा किंवा चिरचिटा असंही म्हणतात. जंगलांमध्ये आणि मोकळ्या परीसरात या वनस्पती दिसून येतात. पण या वनस्पतीचे महत्व माहिती नसल्यामुळे लोक याकडे दुर्लक्ष करतात. यात असे काही गुण असतात ज्यामुळे दातदुखी, पायरीया, हिरड्यांची कमजोरी या समस्या दूर होण्यास मदत होते.
यात मुळापासून सूज आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. जर मुळापासून सूज कमी करायची असेल तर काही खास उपाय करू शकता. नियमित याच्या वापरानं दात मजबूत राहण्यास मदत होते. तसेच सतत होणारी दातदुखीही कमी होते. पायरिया असल्यास हिरड्या कमकुवत होऊन त्यात सूज येते अनेकदा रक्तही बाहेर येतं. यातील औषधी तत्व इंफेक्शन निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करतात. यामुळे पायरियाची समस्या टाळता येत आणि हिरड्या निरोगी राहण्यासही मदत होते. कमजोर हिरड्यांमुळे दात हलू लागतात आणि अन्न चावायला त्रास होतो. या वनस्पतीच्या वापरानं सूज येणं, हिरड्यांचा त्रास आपोआप कमी होण्यास मदत होते. नियमित वापर केल्यास हिरड्या मजबूत होतात.
या वनस्पतीनं गुळण्या करण्यासाठी २०० ग्रॅम आघाडा घेऊन व्यवस्थित बारीक करून घ्या. नंतर १ लिटर पाण्यात उकळवून घ्या. जेव्हा पाणी उकळून उकळून २५० ग्रॅम राहील तेव्हा गॅस बंद करा. रोज २ ते ३ वेळा या पाण्यानं गुळण्या करा. नियमित हा उपाय केल्यास दातदुखी, पायरिया, हिरड्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होते याशिवाय दुर्गंधही येत नाही.
