Urine Infection: युरिन इन्फेक्शन किंवा यूटीआय ही एक त्रासदायक समस्या आहे. ही समस्या झाली तर लघवी करताना जळजळ, खाज किंवा वेदना होतात. तसेच थोड्या थोड्या वेळानं लघवी लागते. जर तुम्हाला सुद्धा ही समस्या नेहमीच होत असेल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यात आम्ही तुम्हाला युरिन इन्फेक्शनमध्ये आराम मिळवण्यासाठी काही नॅचरल उपाय सांगत आहोत. फेमस सेलिब्रिटी आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी हे उपाय शेअर केले आहेत.
काय सांगतात न्यूट्रिशनिस्ट?
धण्याचं पाणी
न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
शाह सांगतात की, धण्याच्या बियांमध्ये डिटॉक्सिफाइंग गुण असतात. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, धणे युरिन इन्फेक्शन दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात. हा उपाय करण्यासाठी मुठभर धणे अर्धा लीटर पाण्यात टाकून उकडा, जेव्हा पाणी अर्ध शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या. हे पाणी थंड झाल्यावर दिवसातून तीन वेळा प्या. यानं जळजळ, वेदना दूर होईल.
कोरफड आणि आवळ्याचं मिश्रण
न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, कोरफडीनं सूज कमी होते आणि आवळ्यामध्ये व्हिटामिन सी भरपूर असतं. या दोन्ही गोष्टींनी मूत्राशय मजबूत होतं. हा उपाय करण्यासाठी १० ते १५ मिली कोरफडीचा गर घ्या, १० मिली आवळ्याचा रस, अर्धी काकडी आणि काही पुदिन्याची पानं घेऊन ज्यूस बनवा. हा ज्यूस तुम्ही दिवसातून दोनदा प्या. या ज्यूसनं आतील सूज कमी होईल आणि मूत्राशय रिपेअर होईल.
जवाचं पाणी
जव हे लघवीसंबंधी समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतात. यानं आतील सूज कमी होईल आणि उष्णता दूर होईल. थोडे जव टाकून पाणी उकडा आणि हे पाणी गाळून दिवसभर थोडं थोडं प्या. यानं लघवीतील अडथळा दूर होईल आणि मूत्र मार्गाची स्वच्छता होईल.
पण जर इन्फेक्शनची समस्या जास्त असेल आणि पुन्हा पुन्हा होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.