Urine Infection in Winter : पुरुष, महिला आणि मुलांना लघवी करताना जळजळ होणे ही एक सामान्य समस्या आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ती घरगुती उपायांनी कमी होऊ शकते, पण वारंवार जळजळ होत असेल, तर ते डिस्युरिया किंवा युरिन इन्फेक्शनचे लक्षण असू शकते. अशावेळी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे.
थंडी जसजशी वाढायला सुरूवात होते, भरपूर लोक थंडीमुळे पाणी कमी पितात. ज्यामुळे शरीरात पित्तदोष वाढतो आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने जळजळही होते. वात-पित्त वाढल्याने लघवीच्या नलिकेत सूज, तापमान आणि इन्फेक्शनची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण लघवी करतो तेव्हा जळजळ, वेदना होतात. अशात ही समस्या दूर करण्यासाठी काय केलं पाहिजं हेच आज आपण पाहणार आहोत.
व्हिटामिन सी
थंडीच्या दिवसांमध्ये आवळे भरपूर मिळतात आणि त्यात व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असतं. हे मूत्राशयात खराब बॅक्टेरिया वाढू देत नाही, त्यामुळे इन्फेक्शनची शक्यता कमी होते. यासाठी सकाळी उपाशीपोटी आवळा खावा किंवा त्याचा ज्यूस पिऊ शकता.
जळजळ कमी करण्यासाठी जास्वंद
जास्वंदाची पानं-फुलं पित्त शांत करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. अशात जास्वंदाच्या फुलांचे सरबत किंवा जास्वंदाचा हर्बल चहा घ्यावा. चहा-सरबतातसाखर टाळा.
छास, बडीशेप पाणी आणि जवाचं पाणी
ही तीनही गोष्टी पित्त कमी करून मूत्रमार्गातील जळजळ कमी करतात.
छासचे फायदे
ताकामुळे पचन सुधारतं, पोटातील जळजळ कमी होते आणि मूत्रमार्गातील सूज कमी होते. साधारण दुपारी १ वेळ छासमध्ये थोडे काळे मीठ टाकून प्यावे.
बडीशेप पाणी
बडीशेपनं शरीराला थंडावा मिळतो आणि इन्फेक्शनही कमी होतं. हे पाणी बनवण्यासाठी 1 ग्लास पाण्यात बडीशेप उकळून घ्या. थंड झाल्यावर दिवसातून दोनदा प्या हे पाणी प्या.
जवाचं पाणी
जवाचं पाणी इन्फेक्शन कमी करण्यासाठी आयुर्वेदात खूप उपयुक्त मानलं जातं. १ लीटर पाण्यात २ चमचे जव उकळा. हे पाणी दिवसभरात थोडं-थोडं प्या.
