Good or Bad Foods : आपण काय खातो आणि काय खात नाही, याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. यातही खाण्याचा आपल्या शरीरातील काही महत्वाच्या अवयवांवर सगळ्यात आधी प्रभाव बघायला मिळतो. हे अवयव म्हणजे किडनी, लिव्हर, हार्ट, डोळे आणि मेंदू आहेत. याच अवयवांमध्ये सगळ्यात जास्त बिघाड बघायला मिळतो. किडनी शरीरात नॅचरल फिल्टरचं काम करतात. जर काही उलटसुलट खाल्लं तर किडनीच्या समस्या होऊ शकतात. तेच इतर अवयवांबाबत सांगता येईल. किडनी स्पेशलिस्ट आणि आयुर्वेदिक डॉक्टर निशांत गुप्ता यांनी या अवयवांसाठी बेस्ट फूड कोणते आणि अनहेल्दी फूड कोणते याबाबत माहिती दिली आहे.
हृदय
हृदय आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचं यंत्र आहे. जर यात काही बिघाड झाला किंवा ते बंद पडलं तर जीव जातो. पूर्ण शरीरात रक्त पंप करण्याचं काम हृदय करतं. हृदयासाठी सगळ्यात अनहेल्दी फूड म्हणजे भजी आहे.
मेंदू
मेंदू आपल्या शरीराचा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. शरीराच्या प्रत्येक क्रियांसाठी याची गरज पडते. मेंदूसाठी सगळ्यात खराब फूड अक्रोडचा हलवा आहे आणि सगळ्यात चांगलं फूड कच्चा किंवा भिजवलेला अक्रोड आहे.
डोळे
आपल्याला जर जवळचा किंवा दूरचा चष्मा लागू द्यायचा नसेल तर गाजर खाणं बेस्ट ठरतं. डोळ्यांसाठी कच्चे गाजरच अधिक फायदेशीर ठरतात. तर गाजराला हलवा काहीच फायद्याचा नसतो.
लिव्हर
अन्न पचन करणे, हार्मोन तयार करणे आणि शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्याचं काम लिव्हर करतं. पण फ्रूट ज्यूस लिव्हरसाठी नुकसानकारक ठरू शकतात. भाज्यांचे ज्यूस लिव्हरसाठी फायदेशीर ठरतात.
किडनी
किडनी शरीरातील विषारी तत्व बाहेर काढतात आणि रक्तही फिल्टर करतात. किडनीसाठी सगळ्यात घातक फूड म्हणजे फिंगर चिप्स आहेत आणि सगळ्यात बेस्ट फूड बटाटे आहेत. बटाटे उकडून खाल तेव्हा फायदेशीर ठरतात.
डॉक्टर निशांत गुप्ता यांनी हेही सांगितलं की, जगातील सगळ्यात खराब खाणं हे पॅकेटमधील असतं. चांगलं तेच असतं ते घरात बनवलं जातं.