ताकद वाढवण्यासाठी गोळी किंवा पावडर खाण्याची गरज नाही. काही लोक बाजारातून सिरप किंवा टॉनिक आणून पितात. अनेकदा शरीर खाल्लेलं अन्न पचवत नाही. त्यामुळे किडनी, लिव्हर, हृदयावर दबाव पडतो. जर शरीरात पोषणची कमतरता असेल तर हे कमी करण्यासाठी तुम्ही ड्राय फ्रुट्सचे सेवन करू शकता. शक्ती वाढवण्याासठी १०० टक्के उत्तम उपाय आहे. ड्राय फ्रुट्स मेंदू, हृदय, किडनी, नसांसाठी मजबूत असते. (Ayurved Doctor Abrar Multani Told To Eat Almons Cashew Soked In Honey To Increase Power And Stamina)
या सूपरफूडमध्ये काजू, बदामचे सेवन सर्वाधिक केले जात. तज्ज्ञांच्यामते यात पॉवरफूल न्युट्रिएंट्स असतात. प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटामीन बी, फॅटी एसिड्स असतात. ज्यामुळे थकवा येत नाही. बदाम पाण्यात भिजवून तुम्ही खाऊ शकता. दुधात काजू-बदाम उकळून खा किंवा मधात काजू-बदाम बुडवून खा.
ज्या लोकांना संपूर्ण दिवसांत कमकुवतपणा, स्टॅमिना कमी असणं, थकवा येणं अशी लक्षणं जाणवतात त्यांन काजू-बदाम मधात बुडवून खायला हवेत. आयुर्वेद एक्सपर्ट्सच्या मते डॉ. अबरार मुल्तानी याला शक्तीशाली उपाय असल्याचं म्हणतात. ज्या दिवशी तुम्ही हा प्रयोग कराल तेव्हा परिणाम दिसायला सुरूवात होईल.
संपूर्ण दिवस ताकद राहील.
मसल्सना ताकद येण्यासाठी एनर्जीची गरज असते. बदामात हेल्दी फॅट्स असतात. काजूमध्ये नॅच्युरल शुगर असते. ज्यामुळे स्टॅमिना लेव्हल वाढते. ब्लड शुगर लेव्हल कमी असणं अजिबात चांगले नाही. अशा लोकांना गोड खाण्याचा सल्ला दिला जातो. डॉ. मुल्तानी सांगतात की मधात बदाम, काजू खाल्ल्यानं तुम्हाला नॅच्युरल शुगर मिळते ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि गंभीर आजार दूर होतात.
ड्रायफ्रुट्स प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम, व्हिटामीन बी, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, ओमेगा 3 नं परीपूर्ण असतात. मधात या शक्तीशाली तत्वांचा भडीमार असतो. ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. डॉ. मुल्तानी हा उपाय सकाळी रिकाम्या पोटी करण्याचा सल्ला देतात. ३ बदाम, ३ काजू, १ चमचा मधात रात्रभर व्यवस्थित भिजवून ठेवा. नंतर सकाळी याचे सेवन करा. ज्या लोकांना ड्रायफ्रुट्सची एलर्जी आहे किंवा डायबिटीस आहे त्यांनी हा उपाय करू नये.