भेंडीची भाजी लहान मुलांची विशेष आवडीची असते. काही लहान मुलं तर असेही असतात जे इतर भाज्या खायला नाक मुरडतात, पण भेंडी मात्र अगदी रोज दिली तरी मजेने खातात. आता मुलांसाठी आणि घरातल्या मोठ्या सदस्यांसाठी दरवेळी वेगवेगळ्या भाज्या करायला वेळ नसतो. त्यामुळे मग मुलांच्या आग्रहाखातर घरात वारंवार भेंडीची भाजी केली जाते. भेंडी आरोग्यासाठी पौष्टिक असली तरी तिचा अतिरेक मात्र टाळायला हवां (Health Tips About Bhendi Or Ladyfinger). काही आजार असणाऱ्या व्यक्तींनी तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच भेंडी खायला हवी.(who should avoid eating bhendi?)
भेंडीची भाजी कोणासाठी त्रासदायक ठरू शकते?
भेंडीमध्ये ऑक्झालेट असतात. जे किडनी रोगासाठी त्रासदायक ठरतात. याशिवाय भेंडीमध्ये असणारे लेक्टीन रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू शकतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनाही जास्त प्रमाणात भेंडी खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.
सर्दी- पडशाचा त्रास आणि घरातले डास.. दोघांनाही पळवून लावण्यासाठी फक्त ५ रुपयांचा भन्नाट उपाय
तुम्ही आज भेंडी खाल्ली आणि उद्या लगेच तुम्हाला त्रास होईल असे नसते. त्याचा परिणाम हळूहळू शरीरावर दिसायला लागतो. त्यामुळे जर किडनीस्टोन किंवा मधुमेह असा कोणताही त्रास तुम्हाला असेल तर भेंडी खाण्यापुर्वी एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं डॉ. पियुष मिश्रा यांनी नवभारत टाईम्सशी बोलताना सुचवलं आहे.
डॉक्टर असंही सांगतात की अर्थरायटीसचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनीही भेंडी खाणं टाळायला हवं किंवा कमी प्रमाणात भेंडी खावी. कारण भेंडीमध्ये असणाऱ्या ऑक्झालेटमुळे शरीरातील युरिक ॲसिड वाढते.
IVF करण्याचं योग्य वय कोणतं? डॉक्टर सांगतात बाळ होण्यासाठी योग्य वेळी-योग्य विचार कसा करायचा..
त्यामुळे जाॅईंट्सवर सूज येणे, संधीवाताचा त्रास वाढणे अशी लक्षणंही दिसू शकतात. याशिवाय ज्यांना नेहमीच पोटदुखीचा त्रास होतो, लघवी करताना जळजळ होते, अशा लोकांनीही भेंडी खाऊ नये. मळमळ, उलट्या असा त्रास होत असतानाही भेंडी खाणं टाळायला हवं.