व्हिटामीन बी-१२ (Vitamin B-12 Deficiency) ज्याला कोबालामिन असंही म्हटलं जातं. हे एक आवश्यक पोषक तत्व आहे. जे आपल्या नर्व्हस सिस्टिमला चांगले ठेवण्यासाठी तसंच ब्लड सेल्स तयार करण्यासाठी फायदेशीर ठरते. आपलं शरीर स्वत: व्हिाटामीन तयार करत नाही. म्हणूनच आहारात या सप्लिमेंट्सचा समावेश करून तुम्ही व्हिटामीन्सची कमतरता भरून काढू शकता. (Amazing Benefits Of Moringa Leaves Can Improve Vitamin B-12 Deficiency Baba Ramdev explained)
शरीरात व्हिटामीन्सची कमतरता भासल्यास काही मानसिक आणि शारीरिक लक्षणं दिसून येतात. जसं की हातापायांना मुंग्या येणं, मांसपेशी कमकुवत होणं, थकवा, डोकेदुखी, चिडचिड होणं, डिप्रेशन, श्वास घ्यायला त्रास होणं, बी-१२ कमतरतेमुळे मानसिक समस्याही उद्भवतात. ज्यामुळे शरीरातील उर्जेचा स्तर कमी होतो आणि मेंदूत रासायनिक संतुलन बिघडते. (Amazing Benefits Of Moringa Leaves)
आयु्र्वेदात या व्हिटामीन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी देशी हर्ब्सचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. आयुर्वेदीक एक्सपर्ट्स आणि योग गुरू बाबा रामदेव यांनी शरीरातील व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर करण्यासाठी शेवगाच्या पानांचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. ही पानं नसांची कमजोरी दूर करतात आणि शरीर हेल्दी ठेवतात.
आयुर्वेदानुसार शेवगा एक अत्यंत शक्तीशाली औषधी वनस्पती आहे. शरीराला संतुलित आणि उर्जावान ठेवण्यासाठीचा एक सर्व गुण संपन्न आहार आहे. आयुर्वेदात शेवगा शरीरातील बी-१२ ची कमतरता दूर करण्यासाठी आवश्यक मानला जातो. या पानांमध्ये आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, बी- कॉम्पेलेक्स अशी तत्व असतात. जी रक्त तयार करण्यास मदत करतात.
रोज या पानांचे सेवन केल्यानं ऊर्जा येते आणि मांसपेशींची शक्ती वाढण्यास मदत होते. शेवगा पचनशक्ती दुरूस्त करतो ज्यामुळे शरीरातील पोषक तत्व सहज पचतात. शेवगा वात, पित्त, कफ हे ३ दोष संतुलित करण्यासाठी उत्तम मानले जातात. यामुळे शरीरातील विषारी तत्व बाहेर निघण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा शेवग्याच्या पानांची पावडर कोमट पाण्यात किंवा मधात घालून प्या.
आयु्र्वेद आणि अधुनिक विज्ञान मानते की शेवगा किंवा शेवग्याची पानं मेंदूसाठी एक नॅच्युरल टॉनिक आहेत. ज्यामुळे एकाग्रता आणि मानसिक संतुलन वाढते. शेवग्याच्या पानांमध्ये केरसेटिन आणि क्लोरोजेनिक एसिड असते ते न्युरॉन डॅमेजपासूनही वाचवतात. ही पानं डोपामाईन आणि सेरेटोनिन सारख्या हॉर्मोन्सचा स्तर वाढवतात ज्यामुळे मूड चांगला होतो आणि डिप्रेशन येत नाही.
