Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिवाळा असो की पावसाळा, सर्दी- खोकला होणारच नाही, प्या तुळशीचा चहा- ६ जबरदस्त फायदे

हिवाळा असो की पावसाळा, सर्दी- खोकला होणारच नाही, प्या तुळशीचा चहा- ६ जबरदस्त फायदे

Health Benefits Of Tulsi Tea or Tulsi Kadha: तुळशीचा चहा कसा करायचा आणि तो चहा नियमितपणे प्यायल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात ते पाहूया...(How to make Indian basil tea?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 11:44 AM2023-12-19T11:44:51+5:302023-12-19T11:47:51+5:30

Health Benefits Of Tulsi Tea or Tulsi Kadha: तुळशीचा चहा कसा करायचा आणि तो चहा नियमितपणे प्यायल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात ते पाहूया...(How to make Indian basil tea?)

Amazing benefits of having tulsi tea or tulsi kadha daily, 1 simple solution to get rid of cold and cough, How to make Indian basil tea? | हिवाळा असो की पावसाळा, सर्दी- खोकला होणारच नाही, प्या तुळशीचा चहा- ६ जबरदस्त फायदे

हिवाळा असो की पावसाळा, सर्दी- खोकला होणारच नाही, प्या तुळशीचा चहा- ६ जबरदस्त फायदे

Highlightsसर्दी- पडशासारखे आजार तर दूर राहतीलच, शिवाय आरोग्याच्या  इतर काही तक्रारीही  कमी होतील

ऋतू बदल झाला की साधारणपणे घरोघरी सर्दी, खोकला, कफ असे त्रास सुरू होतात. हिवाळा आणि पावसाळ्यात तर अशा आजारांचं प्रमाण खूपच वाढलेलं असतं. म्हणूनच आता असे त्रास वारंवार होऊ नये म्हणून हा एक सोपा उपाय करा. तुळशीचा चहा किंवा काढा नियमित प्यायल्याने हवा बदलामुळे होणारे सर्दी- पडशासारखे आजार तर दूर राहतीलच (Amazing benefits of having tulsi tea or tulsi kadha daily), शिवाय आरोग्याच्या  इतर काही तक्रारीही  कमी होतील (1 simple solution to get rid of cold and cough). म्हणूनच आता तुळशीचा चहा कसा करायचा ते पाहूया. (How to make Indian basil tea?)

 

तुळशीचा चहा किंवा काढा कसा करायचा?

तुळशीचा चहा करण्यासाठी एका भांड्यात एक कप पाणी उकळायला ठेवा. 

त्या पाण्यात तुळशीचे स्वच्छ धुतलेले ७ ते ८ पानं तोडून टाका. 

सई लोकूर म्हणते- "फक्त बाळासाठी मी हा कठीण निर्णय घेतला...." बघा नेमकं कशाविषयी सांगतेय..

त्यामध्ये अर्धा टिस्पून आलं, अर्धा टिस्पून हळद आणि थोडा गवतीचहा घाला. हे मिश्रण चांगलं उकळलं की गाळून घ्या. 

या तुळशीच्या चहामध्ये चवीसाठी थोडा मध किंवा गूळ घालू शकता.

 

तुळशीचा चहा पिण्याचे फायदे 

१. तुळशीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर, लोह, झिंक हे घटक भरपूर प्रमाणात असतात.

२. सकाळी रिकाम्यापोटी तुळशीचा चहा प्यायल्यास कफ, सर्दी, खोकला असा त्रास होत नाही.

केस खूप गळतात- अजिबात वाढतच नाहीत? करा १ खास उपाय- केस होतील लांबसडक आणि घनदाट

३. वारंवार अपनाचा, मळमळ होण्याचा त्रास होत असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी तुळशीचा चहा उपयुक्त ठरतो.

४. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी तुळशीचा चहा किंवा काढा प्यावा.

ख्रिसमससाठी परफेक्ट केक करायचा तर लक्षात ठेवा ५ गोष्टी- केक कधीच बिघडणार नाही

५. टाईप २ मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी तुळशीचा चहा मदत करतो.

६. सकाळी नियमितपणे तुळशीचा चहा घेतल्यास दिवसभर फ्रेश राहण्यासाठी उर्जा मिळते. 

 

Web Title: Amazing benefits of having tulsi tea or tulsi kadha daily, 1 simple solution to get rid of cold and cough, How to make Indian basil tea?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.