जेवल्यानंतर छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे, अस्वस्थ वाटणे या अगदी सामान्य समस्या आहेत. (After having lunch or dinner do you feel like vomiting? see the reasons, try easy home remedies )यामागे अपचन, अन्ननलिकेतील आम्लाचे प्रमाण वाढणे या मुळ समस्या आहेत. तसेच चुकीची जीवनशैली, काही सवयी ही कारणीभूत असतात. योग्य सवयी आणि आहार नियम पाळल्यास या त्रासातून सुटका मिळू शकते.
जेवणानंतर लगेच छातीत जळजळ होण्याचे मुख्य कारण म्हणजे आम्लपित्ताचा त्रास. अन्न पचनासाठी जठरात आम्ल तयार होते, परंतु जेव्हा या आम्लाचे प्रमाण वाढते किंवा ते अन्ननलिकेकडे उलटे जाते, तेव्हा छातीत जळजळ जाणवते. याला 'ऍसिड रिफ्लेक्स' असे म्हणतात. काही वेळा जेवणानंतर लगेच झोपणे, वाकणे किंवा पचायला जड अन्न खाल्ल्याने हा त्रास वाढतो. विशेषतः तळलेले, मसालेदार, फास्टफूड किंवा कोणतेही पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले की पचनात अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे आंबट ढेकर येण्यास सुरुवात होते.
शरीराची हालचाल न करता लगेचच झोपल्याने किंवा आडवे झाल्यामुळे अन्न आणि आम्ल परत वर येण्याची शक्यता अधिक असते. हे अन्ननलिकेतील स्नायूंवर दाब तयार करतात आणि त्यामुळे जळजळ आणि ढेकर येऊ लागतात. याशिवाय जेवणाच्या वेळी खूप घाईने जेवण्याची अनेकांना सवय असते. ही सवय फार वाईट. असं म्हणतात एक घास बत्तीस वेळा चाऊन खावा. आता बत्तीस वेळा नाही तरी तो असाच गिळू नये. व्यवस्थित पातळ करा मगच गिळा.
या त्रासावर उपाय म्हणून काही साधे पण प्रभावी नियम पाळणे उपयुक्त ठरते.
१. जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळावे. किमान २ ते ३ तासांनी झोपावे जेणेकरून अन्नाचे योग्य पचन होते.
२. जेवणानंतर थोडा वेळ हळू चालणे फायदेशीर ठरते. यामुळे अन्न खाली सरकण्यास मदत होते आणि आम्ल वर जाण्याची शक्यता कमी होते.
३. सुंठ, ओवा, जिरे हे पचनास मदत करणारे घटक आहेत. त्यांचा समावेश आहारात असावा. अपचन होणार नाही. जेवल्यानंतर आवळा सुपारी तसेच बडीशेप खावी.