बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे ((Akshay Kumar) वय ५७ वर्ष असले तरी तो आपल्या जबरदस्त फिटनेसमुळे अजूनही तरूण दिसतो. एक खास फळ त्याच्या तब्येतीसाठी बरंच फायदेशीर ठरतं. जेव्हा अक्षय जेवत नाही तेव्हा आवर्जून हे फळ खातोच. तुम्हाला वाटेल हे फळ महाग असेल तर तसंही काही नाही.अक्षय रोज १ तास व्यायाम, डाएट उत्तम सांभाळतात. (57 Years Old Akshay Kumar Called This Yellow Fruit Treasure Of Health He Takes Such Diet To Look Like 40)
रात्रीचं जेवण लवकर
अक्षय कुमार रात्री ७ नंतर काहीच खात नाही हे तर आता सर्वांनाच माहिती आहे.
जेवणात १ वाटी ही डाळ खा, बॅड कोलेस्टेरॉल घटेल-बीपी कंट्रोलमध्ये येईल, वजन भराभर घटेल
चांगली झोप
अक्षयकुमार लवकर जेवण्याबरोबरच आपल्या झोपेचीही काळजी घेतो. रात्री लवकर झोपतो. आणि कमीत कमी ८ ते ९ तासांची झोप घेतो. ज्यामुळे शरीर लवकर रिकव्हर होते आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते.
आहार खूपच साधा
अक्षय कुमार फिट राहण्यासाठी ते काय खातो? तो सांगतो, मी कधीच कोणतेही फॅन्सी मील्स किंवा फूड खात नाही. घरचं साधं खातो. बिनमसाल्याचे पदार्थ खातो. जेव्हा जेवायला वेळ मिळत नाही तेव्हा केळी खातो.आहारात केळी असावी असा सल्ला त्यांनी सर्वांनाच दिला आहे.
केळीमुळे भूक नियंत्रणात ठेवता येते. शरीराला पोषण मिळते. शरीर एनर्जेटीक राहते आणि आवश्यक पोषक तत्व मिळतात.