Join us

उष्माघातामुळे तुमच्यासमोर अचानक कोणाला भोवळ आली तर? ५ गोष्टी तातडीने करा, डॉक्टर सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2024 15:58 IST

How To Treat If Someone Is Suffering From Heat stroke: आपल्यासमोर कोणाला अचानकपणे उष्माघाताचा त्रास झाला किंवा आपल्याला स्वत:लाही तो त्रास जाणवू लागला तर ऐनवेळी गडबड होऊ नये म्हणून या काही गोष्टी लक्षात असू द्या...(5 important tips about heat stroke)

ठळक मुद्दे या काही साध्या- सोप्या गोष्टी लक्षात ठेवा आणि गरज पडल्यास करा. यामुळे रुग्णाला बऱ्याच प्रमाणात आराम मिळू शकतो.

उन्हाचा पारा आता चांगलाच वाढला आहे. काही ठिकाणी तर तापमान चाळिशीपर्यंत पोहोचले आहे. सध्याच उन्हामुळे सगळे हैराण झालेले आहेत आणि त्यात पुन्हा हवामान खात्याने पुढच्या काही दिवसांत उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्याच्या या दिवसांमध्ये आणि उष्णतेची लाट आल्यानंतर उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जर उष्माघाताचा त्रास होऊन आपल्यासमोर कोणाला अचानक भाेवळ आली तर त्यावेळी घाबरून जाऊन उपयोग नाही. म्हणूनच या काही साध्या- सोप्या गोष्टी लक्षात ठेवा आणि गरज पडल्यास करा. यामुळे रुग्णाला बऱ्याच प्रमाणात आराम मिळू शकतो. (5 important tips about heat stroke)

 

उष्माघाताचा त्रास झाल्यास काय करावे?

१. रुग्णाला लगेच आडवे झोपण्यास सांगावे आणि त्याच्या पायाखाली उशी किंवा तशीच एखादी जाडसर वस्तू द्यावी.

२. उष्माघाताचा त्रास होणाऱ्या व्यक्तीला एखाद्या सावलीत, थंडगार ठिकाणी आणून बसवावे.

माधुरी दीक्षित केसांना महागडं, ब्रॅण्डेड नाही, तर 'हे' साधं घरगुती तेल लावते, बघा व्हायरल व्हिडिओ

३. रुग्णाच्या अंगावर, डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या. तळपाय- तळहात यांनाही थंड पाणी लावावे. .

४. बऱ्याचदा उष्माघाताचा त्रास झाल्यास व्यक्तीला उलटी येते. अशावेळी त्यांना उठून बसविण्याच्या ऐवजी एका कुशीवर वळवावे.

५. त्यांच्या अंगावरचे कपडे सैलसर करण्याचा प्रयत्न करावा. हे सगळे प्रथमोपचार लगेचच करून रुग्णाला तात्काळ जवळच्या दवाखान्यात न्यावे.

 

उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून

१. डोक्यावर रुमाल, टोपी, छत्री असं काहीतरी घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नये.

भर उन्हाळ्यातही फुलांनी भरगच्च बहरून जातील रोपं, करून बघा 'या' जादुई पाण्याची कमाल

२. दु. १२ ते सायं. ४ यावेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये. 

३. पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवावे. वेळोवेळी ताक, लिंबूपाणी, नारळपाणी, पन्हे असे द्रव पदार्थ घ्यावेत.

 

हे देखील लक्षात घ्या.. 

अतिउष्णतेमुळे अतिसार, डोकेदुखी असा त्रास होत असणारे रुग्णही बरेच आहेत. याकाळात शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे ठेवले पाहिजे. घाम येऊन शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.

कुलर खरेदी करण्यापुर्वी ५ गोष्टींची खात्री करून घ्या, खरेदी होईल परफेक्ट आणि उन्हाळा सुपरकूल... 

त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. यामुळे चक्कर येणे, मळमळ होणे असा त्रासही होतो. काही ठिकाणी विषाणू संसर्गामुळे घसादुखी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे, असे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससमर स्पेशलउष्माघात