Join us

‘ही’ ५ फळं खाल्ल्यावर चुकूनही पाणी पिऊ नका, पोटाला होईल गंभीर त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2023 17:33 IST

5 fruits after which one should not drink water फळं खावीत पण त्यावर ढसाढसा पाणी पिणं धोक्याचं ठरु शकतं.

फळे हे आपल्या निरोगी आहाराचा अविभाज्य भाग आहे. फळे नियमित खाल्ल्याने आरोग्याला अनेक पोषक घटक मिळतात. प्रत्येक फळाचा वेगळा गोडवा आहे. प्रत्येक फळाची वेगळी खासियत आहे. फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, कॅल्शियम, लोह असे सर्व आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक आहे. बरेच लोक जेवणासोबत, रात्री, दुपारी किंवा कोणत्याही गोष्टीसोबत फळे खातात.

फळे खाण्याची ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. तसेच फळे खाल्ल्यानंतर बरेच लोक भरपूर पाणी पितात. ही चूक आपल्या आरोग्यावर भारी पडू शकते. डॉ.विनोद शर्मा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांच्या मते, 'काही फळे अशी आहेत, जी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे पिऊ नये. असे केल्याने पोट यासह पचनाच्या निगडीत त्रास उद्भवू शकतो'(5 fruits after which one should not drink water).

डाळिंब

डाळिंब हे एक असे फळ आहे, जे सर्वांनाच आवडते. डाळिंब खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यासह रक्ताची वाढ होते. परंतु, डाळिंब खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. असे केल्याने आपल्याला मळमळ, आम्लपित्त आणि उलट्या होऊ शकतात.

केळी

केळी हा ऊर्जेचा एक मजबूत स्रोत आहे. त्यात पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळते. केळीमुळे बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. मात्र, केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, यामुळे पचनक्रिया खराब होऊ शकते.

सकाळी की रात्री नक्की दूध प्यावं कधी? रात्री दूध पिण्याचे फायदे किती? कोणी दूध पिणे टाळावे?

आंबट फळे

संत्री, आवळा, द्राक्ष, यासारखे आंबट फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. असे केल्याने शरीराची पीएच पातळी बिघडू शकते. यासह पचनसंस्था देखील बिघडते.

कलिंगड

लाल रंगाचे कलिंगड हे उन्हाळ्यात फार मिळते. हे फळ खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहते. परंतु, कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. डॉक्टरांच्या मते, असे केल्याने पचनक्रिया बिघडू शकते, ज्यामुळे लूज मोशनसारखा त्रास छळू शकतो.

करवटे बदलते रहे सारी रात..? सायंकाळी ४ चुका टाळा, तरच रात्री लागेल शांत झोप

पेरू

पेरू फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड, पोटॅशियम, कॉपर यांचा उत्तम स्रोत आहे. नियमित पेरू खाल्ल्याने पचनाच्या निगडीत समस्या दूर होतात. परंतु, पेरू खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने, पचनक्रिया बिघडू शकते.

टॅग्स : हेल्थ टिप्सफळेआरोग्य