lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > करवटे बदलते रहे सारी रात..? सायंकाळी ४ चुका टाळा, तरच रात्री लागेल शांत झोप

करवटे बदलते रहे सारी रात..? सायंकाळी ४ चुका टाळा, तरच रात्री लागेल शांत झोप

Disturbed Sleep: Causes and Treatments - Avoid 4 Mistakes after Sunset संध्याकाळनंतर या ४ गोष्टी चुकूनही करू नका, झोपेसह आरोग्यही बिघडेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2023 04:36 PM2023-08-23T16:36:36+5:302023-08-23T16:37:37+5:30

Disturbed Sleep: Causes and Treatments - Avoid 4 Mistakes after Sunset संध्याकाळनंतर या ४ गोष्टी चुकूनही करू नका, झोपेसह आरोग्यही बिघडेल..

Disturbed Sleep: Causes and Treatments - Avoid 4 Mistakes after Sunset | करवटे बदलते रहे सारी रात..? सायंकाळी ४ चुका टाळा, तरच रात्री लागेल शांत झोप

करवटे बदलते रहे सारी रात..? सायंकाळी ४ चुका टाळा, तरच रात्री लागेल शांत झोप

मानसिक आणि शारीरिक स्थिती सुधारण्यासाठी शरीराला व्यायाम आणि आहार जितका महत्वाचा आहे, तितकीच झोप देखील महत्वाची आहे. रात्रीची झोप व्यवस्थित झाली तर, दुसऱ्या दिवशी काम करण्याची उर्जा मिळते. मात्र, धावपळीच्या या जीवनात स्ट्रेस आणि स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे आपली झोप कुठे आणि कधी उडून जाते, हे कळून देखील येत नाही.

स्लीप सायकल जर अशीच बिघडलेली राहिली, तर आरोग्याच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. रात्रीच्या वेळी मोबाईल फोनचा वापर, उशिरा डिनर करणे यासह अनेक करणांमुळे झोप बिघडण्याची स्थिती निर्माण होते. झोप बिघडण्यामागे नक्की कारणे कोणती आहेत पाहूयात(Disturbed Sleep: Causes and Treatments - Avoid 4 Mistakes after Sunset).

या सवयींमुळे झोपेचं चक्र बिघडतं

झोपण्यापूर्वी जास्त खाणे

स्लीप बेटर लाइव्ह बेटर या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, बरेच लोकं रात्री उशिरा डिनर करतात. वेळेवर न जेवल्यामुळे आजार तर छळतात, यासह स्लीप सायकलमध्येही प्रॉब्लेम्स निर्माण होतात. उत्तम आरोग्यासाठी रात्रीच्या वेळी हलका आहार घ्यावा. रात्री जास्त खाणे टाळा. झोपण्याच्या काही तास आधी जेवणाचा प्रयत्न करा. ओवरइटिंग टाळा.

उपवास असेल तर दिवसभरात ७ गोष्टी करा आणि उपवास सोडतानाही ५ गोष्टी लक्षात ठेवा, तर उपवास होईल सोपा

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह झोपणे

रात्रीच्या वेळी अनेकांना मोबाईल फोन, टेलिव्हिजन किंवा लॅपटॉप पाहत झोपण्याची सवय असते. परंतु, ही सवय आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. अनेकदा रात्री झोपत असताना आपण मोबाईल फोन पाहतो. व झोप आल्यानंतर उशी खाली फोन ठेऊन झोपतो. ही सवय चांगली नाही. कारण मोबाईलमधून रेडिएशन बाहेर पडतं, ज्यामुळे स्लीप सायकलमध्ये अडथळे येऊ शकतात.

दिवसा झोप घेणे

अनेकांना दुपारच्या वेळी झोप लागते. काही लोकं लंच झाल्यानंतर, अर्धा तास झोपतात. परंतु, दिवसा अधिक वेळ झोपल्याने रात्री लवकर झोप येत नाही. यामुळे स्लीप पॅटर्नमध्ये डिस्टर्ब होऊ शकते.

कोणती डाळ खाल्ल्याने गॅसेसचा त्रास होतो? अपचन-करपट ढेकर येतात? ५ डाळी करा बाद कारण..

झोपण्यापूर्वी कॅफीनचे सेवन

अनेक लोकं रात्रीच्या वेळी काम किंवा अभ्यास करण्यासाठी कॅफीनयुक्त पेय पितात. पण यामुळे झोपेचं चक्र बिघडू शकते. त्यामुळे झोपण्यापूर्वी किंवा सायंकाळच्या ८ वाजेच्यानंतर कॅफीनयुक्त पेय पिणे टाळा.

Web Title: Disturbed Sleep: Causes and Treatments - Avoid 4 Mistakes after Sunset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.