आजच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमुळे फॅटी लिव्हरच्या समस्येचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसते. चुकीचा आहार, जास्त तेलकट आणि प्रोसेस्ड पदार्थ खाण्याची सवय, धूम्रपान, मद्यपान तसेच शारीरिक हालचालींची कमतरता हे सर्व घटक लिव्हरवर चरबी जमा होण्यास कारणीभूत ठरतात. सुरुवातीला ही समस्या गंभीर वाटत नसली तरी, दुर्लक्ष केल्यास ती पुढे लिव्हरच्या गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते. फॅटी लिव्हरच्या समस्येवर औषधोपचार करण्यासोबतच, आहार (best home remedies for fatty liver) आणि लाईफस्टाईलमधील योग्य बदल हे उपचारात अत्यंत महत्त्वाचे ठरतात. चांगले आरोग्य राखण्यासाठी आणि लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी, आपल्या स्वयंपाकघरातील काही नेहमीच्या वापरातील पदार्थ खूपच फायदेशीर ठरतात. काही नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांच्या मदतीने लिव्हरवरील चरबी कमी करून ते पुन्हा निरोगी करता येते(5 Best Home Remedies to Heal Fatty Liver and Boost Weight Loss).
फॅटी लिव्हरच्या समस्येसोबत वजन कमी करणे देखील खूप कठीण होते. अनेकवेळा आपले हट्टी वाढलेलं वजन हे मंद मेटाबॉलिज्ममुळे नव्हे, तर लिव्हरमध्ये साठलेल्या चरबीमुळे देखील कमी होत नाही. अशा परिस्थितीत, आपण असे ५ उपाय जाणून घेणार आहोत, जे फॅटी लिव्हर कमी करण्यासोबतच वजन कमी करण्यास देखील मदत करतील. प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट रमिता कौर यांनी त्यांच्या एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये, अशा काही पदार्थांचा आहारात समावेश करण्यास सांगितला आहे की, ते फक्त लिव्हरवरील चरबीच कमी करणार नाही, तर वजन घटवण्यातही फायदेशीर ठरतील.
फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय...
१. आवळ्याचे पाणी :- आवळा हे आयुर्वेदात सर्वात शक्तिशाली फळांपैकी एक मानले जाते, जे अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनीयुक्त असे परिपूर्ण फळं मानले जाते. दररोज आवळ्याचे पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले सर्व विषारी घटक बाहेर पडतात आणि फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते. यासाठी, तुम्ही दररोज सकाळी एक छोटा चमचा आवळा पावडर किंवा १५ मिली आवळ्याचा रस गरम पाण्यात मिसळून पिऊ शकता.
२. जिरे आणि ओव्याचे पाणी :- रोजच्या आहारात जिरे आणि ओवा याच्या पाण्याचा देखील समावेश करू शकता. हे पाणी पचनक्रिया सुधारण्यास आणि चयापचय क्रियेत सुधारणा करण्यास मदत करते. हे पाणी तयार करण्यासाठी २ कप पाण्यात १ छोटा चमचा जिरे आणि १ छोटा चमचा ओवा घालून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळा. त्यानंतर ते गाळून घ्या आणि रोज हळूहळू घोट-घोट करून प्या.
३. पपईची स्मूदी :- पपई फळामध्ये चरबी जाळण्याचे गुणधर्म असतात, ज्यामुळे ती फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही रोज पपईची स्मूदी प्याल, तर ती नैसर्गिकरित्या चरबी जाळण्यास करण्यास मदत करते.
४. ग्रीन टी किंवा कॅमोमाइल टी :- आपण रोज एक ते दोन कप ग्रीन टी किंवा कॅमोमाइल टी देखील पिऊ शकता. यामुळे लिव्हरच्या एन्झाईम्समध्ये सुधारणा होते आणि फॅटी लिव्हर बरे होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर, संशोधनातून असे दिसून आले आहे की, ग्रीन टी प्यायल्याने फॅटी लिव्हरच्या आजारापासून बचाव करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.
५. अळशीच्या बियांची पावडर :- फॅटी लिव्हरच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी, आपण अळशीच्या बियांची पावडर देखील वापरु शकता. अळशीच्या बियांची पावडर लिव्हरची सूज (Liver Inflammation) कमी करण्यास मदत करते. तुम्ही रोज दुपारच्या जेवणानंतर १ छोटा चमचा भाजलेल्या अळशीच्या बियांची पावडर देखील खाऊ शकता.
